• Mon. Apr 20th, 2026

५१ वर्षीय दिव्यांग, मूकबधिर महिलेवर अत्याचाराची घटना

Bybaba maske

Apr 19, 2024

५१ वर्षीय दिव्यांग, मूकबधिर महिलेवर अत्याचाराची घटना

रोखठोक न्युज वार्ताहर

युसूफवडगाव ठाण्यात एकावर बलात्कार, अॅट्रॉसिटीचा गुन्हा

घरापासून जवळ एकटीच असलेल्या ५१ वर्षीय दिव्यांग व मुकबधिर असलेल्या महिलेवर अत्याचार केल्याची घटना युसुफवडगाव ठाण्याच्या हद्दीतील एका गावात घडली. याप्रकरणी एक जणांविरुद्ध बलात्कार, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

केज तालुक्यातील एका गावातील दिव्यांग व मूकबधिर असलेली ५१ वर्षीय महिला ही घरापासून १०० फूट अंतरावर शेतात १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता एकटीच होती. ती एकटीच असल्याची संधी साधून तिच्या

दिव्यांग व मूकबधिरपणाचा फायदा घेत सुभाष यशवंत कोरडे (रा. केकतसारणी ता. केज) याने तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. पीडित महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष कोरडे याच्याविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात बलात्कार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना व सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आरोपी सुभाष कोरडे हा फरार असून पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे करीत आहेत.

 

 

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!