नगरपंचायत समोर पाण्या साठी महिलांचा ठिय्या.
अडीच वर्षांत काही काम तर केले नाही साधे पाणी तरी द्या.
दलित-मुस्लिमाचा राजकारण करणारे लागले भाजपच्या प्रचाराला!
मताच बॅलन्स वाढवण्या पेक्षा स्वतःच बॅलन्स वाढवणार.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज येथील नगरपंचायतच्या वतीने पाणीपुरवठय़ाच नियोजन योग्य पद्धतीने केले जात नाही.त्यामुळे शहरातील बहुतेक भागात पाण्या साठी नागरिकांची पायपीट चालु आहे. बहुतांशी भागात नगरपंचायतने पाईपलाईन टाकली नाही त्यामुळे तिथे वर्षभर पाण्याची बोंबाबोंब असते.
गेल्या अडीच वर्षांपासून नगरपंचायत जनविकास आघाडी व काँग्रेस यांच्या ताब्यात आहे गेल्या अडीच वर्षांत यांनी नगरपंचायत कडून होणारे कुठलेच काम डोळ्यात भरतील असे केले नाही.फक्त जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे.फक्त “बडे बडे बात्ता हमको कुच्छ नही आता” या उक्तीनुसार कारभार करतात. ना येथे यांच्या भ्रष्टाचारी कारभारा मुळे अधिकारी टिकला नाही. नगरपंचायतला मुख्यधिकारी सहा महिन्याच्या वर टिकला नाही.नगरपंचायत अधीक्षक प्रभारी,मुख्याधिकारी प्रभारी,सगळा नगरपंचायत भोंगळ कारभार याचा उद्रेक म्हणजे काल लोंढे गल्ली,शिंदे गल्ली, अजिजपुरा येथेल महिलांनी नगरपंचायत मध्ये पाण्या साठी ठिय्या दिला या आगोदर निवेदन देऊन ही याची दखल घेतली जात नसल्यामुळे अंदोलक महिला आक्रमक झाल्या होत्या.पुन्हा एकदा अश्वासनाची बोळवण करून यांना पाठवल पण केज शहरातील पाणी प्रश्न तसाच आहे.
गेल्या अडीच वर्षांत स्वतःच बँक बॅलन्स वाढवण्या शिवाय येथील सत्ताधाऱ्यांकडून काहीच काम नाही.विना परवानगी मोक्याच्या ठिकाणी बांधकाम चालु आहेत, जेकी प्लांटीग जनविकास च्या सर्वेसर्वा म्हणून घेणाऱ्या च्या जवळची किंवा स्वतःची आहे.
शहरात दलित-मुस्लिमाच राजकारण करणारे हे आता भाजपचा इसार घेऊन प्रचार करतायत पण गेल्या अडीच वर्षांत शहरात कुठलेच काम केले नाही तर मग जनता यांना कुठल्या तोंडाने मतदान करणार.
निवडणूकीत येणारी रसद घेऊन नगरपंचायत आपल्या ताब्यात आहे व जनता आपल्या पाठिशी आहे असे दाखवून भाजप कडून येणारी रसद ढेकर न देता पचवली जाणार ऐवढ मात्र खर.
