भीमजयंती मधील शिल्लक रक्कम 2 लाख 10 हजार बाळासाहेब आंबेडकर यांच्या खात्यात स्वाभिमान निधी म्हणून जमा केला.
अंबाजोगाईतील जयभीम नगर येथील स्तुत्य उपक्रम.
रोखठोक न्युज वार्ताहर
अंबाजोगाईतील जयभीम नगर मोरेवाडी मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सालाबादा प्रमाणे भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असते,या ही वेळेस ती खूप उत्साहात साजरी झाली.जयंती कार्यक्रमाला आठ दिवसाच्या भरगच्च कार्यक्रम व्याख्याने,सांस्कृतिक कार्यक्रम शेवटच्या दिवशी बाबासाहेबांच्या भव्य प्रतिमेची मिरवणूक व सर्वाना जेवण असे कार्यक्रम आयोजित केले होते त्या नंतर ही समाजातून जमा केलेली वर्गणी शिल्लक राहीली त्या शिल्लक निधीतून काय करायचा असा विचार ज्या वेळेस कमिटी समोर आला त्यावेळेस एकमताने आपल्या भीमजयंतीतील शिल्लक रक्कमसह एकूण 2 लाख 10 हजार रुपये आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या खात्यात स्वाभिमान निधी म्हणुन जमा करण्याचा प्रस्ताव आला व तो एकमुखी निर्णय मान्य करून तात्काळ 2 लाख 10 हजाराचा निधी बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्ष वंचित बहुजन आघाडी ही आर्थिक मजबूत करून बळ देण्याच्या भावनेतून जमा करण्यात आला, या मुळे अंबाजोगाई,मोरेवाडी जयभीम नगर येथील उत्सव कमिटीच व नागरिकांच सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
