युवकाने कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम मशिन फोडले
रोखठोक न्युज वार्ताहर
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यांतील 88 लोकसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी 8 जागांसाठी आणि बिहारमधील 5 जागांसाठी मतदान पार पडत आहे.
राज्यातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशीम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघात आज 26 एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदारांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. पण याचदरम्यान, नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अशातच नांदेडमध्ये एका युवकाने कुऱ्हाडीने चक्क ईव्हीएम मशीन फोडल्याची धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
