• Sun. Apr 19th, 2026

नाहीतर ‘त्या’ कॅसेट निवडणूक आयोगाकडे देईल,” बजरंग सोनवणे यांचा धनंजय मुंडेंना इशारा.

Bybaba maske

Apr 26, 2024

नाहीतर ‘त्या’ कॅसेट निवडणूक आयोगाकडे देईल,” बजरंग सोनवणे यांचा धनंजय मुंडेंना इशारा.

रोखठोक न्युज वार्ताहर 

महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तर महायुतीकडून भाजप नेत्या पकंजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अशातच आता मंत्री धनंजय मुंडेंना बजरंग सोनवणे यांनी गंभीर इशारा दिला आहे.

वडवणी तालुक्यातल्या कोठारबन येथे बजरंग सोनवणे यांनी सभा घेतली. यावेळी ते म्हणाले की, “धनंजय मुंडे मला बहुरंगी म्हणतात. पण त्यांचा बहुरंगी पणा संपूर्ण राज्याने पाहिला आहे. मी रंगात रंग मिसळणारा बजरंग आहे. दोन्ही बहीण भावाने माझ्यावर टीका करण्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं,” असे आव्हान बजरंग सोनवणे यांनी दिले आहे.

“धनंजय मुंडे फोनवर लोकांना एकेरी भाषेत कशा शिव्या देतात, याच्या माझ्याकडे चार कॅसेट असल्याने त्यांनी माझ्यावर टीका करू नये. नाहीतर मी निवडणूक आयोगाकडे या कॅसेट सादर करील,” असा गंभीर इशाराच बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. बजरंग सोनवणे यांच्या इशाऱ्यावर आता धनंजय मुंडे कशाप्रकारे प्रत्युत्तर देतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!