• Thu. Jul 30th, 2026

प्राचार्य नंदकिशोर फुलारी यांची स्वतःच्या कॅबीन मध्ये आत्महत्या.

Bybaba maske

Apr 25, 2024

प्राचार्य नंदकिशोर फुलारी यांची स्वतःच्या कॅबीन मध्ये आत्महत्या.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बालाजी शिक्षण संस्था अंबाजोगाई येथील खाजगी शिक्षण संस्थेच्या बी. एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांनी आज सायंकाळी 4:30 वाजता महाविद्यालयाच्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी हे गेली अनेक वर्षांपासून या संस्थेने सुरु केलेल्या विविध शैक्षणिक युनीट मध्ये कार्यरत होते. या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून त्यांच्याकडे बरीच वर्षांपासून प्राचार्य पदांची जबाबदारी होती. बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध उपक्रमातील एक गुणवान, हुषार, अभ्यासू आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे प्राचार्य म्हणून डॉ. नंदकिशोर फुलारी यांची ओळख होती. संस्थेच्या सर्व उपक्रमात त्यांचा हिरहिरीने सहभाग असायचा. प्राचार्य डॉ. नंदकिशोर फुलारी यांनी नव्यानेच बांधलेल्या घराची वास्तुशांती याच महिन्यात 6 तारखेला झाली होती. आज दुपारी चार वाजेपर्यंत त्यांनी सहकाऱ्यांसोबत हसतखेळत संवाद साधला. ते निघून गेल्यानंतर त्यानंतर कार्यालयातील कर्मचाऱ्याला काम सांगून खालच्या मजल्यावर पाठवले आणि त्यानंतर त्यांनी बॅगमध्ये सोबत आणलेल्या दोरीच्या साह्याने कार्यालयातील फॅन गळफास घेतला. महाविद्यालयाच्या इमारतीची झाडझुड करीत सेवक प्राचार्य डॉ. फुलारी यांच्या पारदर्शक कॅबिनपर्यंत पोहोचताच त्यांच्या निदर्शनास ही बाब आली आणि त्याने ही माहिती संस्थेच्या इतर कर्मचारी व संचालकांना दिली. थोडावेळ आधीच हसतखेळत बोलणाऱ्या प्राचार्य फुलारी यांच्या मनात असे काही सुरु असेल याची यत्किंचीतही शंका नसल्याने त्यांच्या सहकाऱ्यांना या घटनेमुळे प्रचंड धक्का बसला. या घटनेमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत शवविच्छेदन अहवालासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवले आहे.पोलीस अधिक तपास करीत आहेत.

baba maske

Related Post

केज पोलिसांची मोठी कारवाई! घरफोडीतील आरोपी अवघ्या ४८ तासांत जेरबंद; ३.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा व केज पोलिसांची संयुक्त कारवाई; रोख रक्कम व चांदीचे दागिने जप्त
लाडक्या बहिणींना मोठा धक्का! राज्यभरातून तब्बल ९२ लाख नावे वगळली; बीड जिल्ह्यात सर्वाधिक अपात्र लाभार्थी बीड जिल्हा यात ही पुढेच 
शिक्षकाचा संशयास्पद मृत्यू; तथागत चौकात मृतदेह आढळल्याने खळबळदोन दिवसांत दुसरी गंभीर घटना; शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!