• Fri. Sep 18th, 2026

पोलीस वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू.

Bybaba maske

May 6, 2024

पोलीस वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू.

रोखठोक न्युज वार्ताहर

रस्त्याच्या कडेला मोटरसायकल उभारुन फोनवर बोलत थांबलेल्या तरुणास भरधाव वेगाने येणाऱ्या पोलीस गाडीने धडक दिल्याने तरुण गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली होती.

उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून पोलिस चालका विरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील मौजे गिरवली बावने येथील हनुमंत महादेव पवार वय 33 हा मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो.

दि.पाच में रोजी मौजे बन्सारोळा येथे लग्न समारंभात बॅंड पथकात काम करुन संध्याकाळी साडेसात वाजता गिरवली गावाकडे परतताना लोखंडी सावरगाव जवळ रस्त्याच्या कडेला मोटरसायकल क्र.MH 38 A 8091 उभारुन फोनवर बोलताना बीड पोलीस मुख्यालयावरुन पोलीस वाहन क्र. MH23AS0019 मारुती इरटिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला बंदोबस्तासाठी येत असताना पोलिस वाहन चालक पो.हे.538 विजय तुकाराम गोरे (पाटोदा पोलीस ठाणे) हे आपल्या ताब्यातील पोलीस वाहन भरधाव वेगाने बेदरकारपणे चालवत उभ्या असलेल्या हनुमंतला जोराची धडक देत पोलीस गाडी खड्डयामध्ये पडली.

धडकेत हनुमंत गंभीर जख्मी झाला.त्यास उपचारासाठी स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारा दरम्यान रात्री अकरा वाजता पवार यांचा मॄत्यू झाला असल्याची फिर्याद मयताचे चुलते मारुती विश्वांभर पवार यांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

मयत हनुमंत पवार यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे.घरातील कुटूंब प्रमुख अपघात वापरल्यामुळे पवार कुटुंब उघड्यावर पडले आहे. या घटनेमुळे गिरवली गावावर शोककळा पसरली आहे. अपघातास कारणीभूत असणारा पो.हे.विजय गोरे याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रंगनाथ जगताप करत आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!