मोदी आले अण बुडत्या पंकजाताईचे पाय खोलात गेले.
त्यात धनुभाऊची कडी उकळून उतू गेली.
रोखठोक न्युज वार्ताहर
भाजप ज्या वेळेस पराभूत होत असते त्या वेळेस धर्माचे कार्ड खेळते याचा प्रत्यय प्रत्येक निवडणूकीत येते.मुस्लिम तुष्टीकरण, राम मुद्दा,370 सिएए,एनसीआर असे मुद्दे प्रचारात आणले जातात.
स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्याच राजकारण करत असताना सामाजिक दरी कधी पडू दिली नाही.त्यांना मानणारा मुस्लिम समाज ही मोठ्या प्रमाणात होता त्याच मुळे ते आणि त्यांच्या नंतर खासदार प्रितम मुंडे या मोठ्या मत्ताधिक्याने निवडून आले.
पण 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना प्रथमच मोठ्या प्रमाणावर जातीय राजकारणाला समोर जात असताना काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत पंकजाताई यांनी मुस्लिम समाजा बदल चांगली गोष्टी बोलल्या नंतर अचानक नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मुस्लिम तुष्टीकरणाची भाषा वापरायला चालु केली आणि याचा होयचा तो परिणाम आता निवडणुकीत दिसेल.
जे तीन-चार टक्के मुस्लिम मतदान पंकजा मुंडे यांना भेटणार होते ते भेटणे अशक्य झाल्याच बोलले जात आहे.
त्यातच पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी कडी केली जी रेल्वे दहा वर्षांत बीड पंर्यत आली नाही तोवरच घाटनांदुर-अंबाजोगाई रेल्वेमार्गाचे आश्वासन दिले.त्यानंतर सरळ कोकणातील पाणी बीड जिल्ह्य़ात आणणार त्या साठी पंकजाताई यांना लोकसभेत पाठवा अशी भिमगर्जना केली.बीडला रेल्वे आणता आणता एक पिढी म्हातारी झाली आणि आता कोकणातून पाणी येई पर्यंत किती पिढ्या म्हातार्या होतील याची गिनती कोणी करावी? असे काल संपुर्ण जिल्ह्य़ात जोरदार चर्चा होती त्यामुळेच मोदीच्या भाषणाने अगोदरच मराठा ओबीसीं चालु असताना आता मुस्लिमाची भर पडली तर धनुभाऊची कडीच उतू गेली अशी चर्चा गावागावात होती.
