• Fri. May 1st, 2026

चोरांचे पोलीसानांच अहवान आधी पोलीस निरीक्षका च्या घरी चोरी तर आता पोलीसाच्या अंगठ्या पैसे काढून घेतले.

Bybaba maske

May 8, 2024

चोरांचे पोलीसानांच अहवान आधी पोलीस निरीक्षका च्या घरी चोरी तर आता पोलीसाच्या अंगठ्या पैसे काढून घेतले.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड जिल्ह्यात लुटमारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. अंबाजोगाईत प्रधानमंत्री मोदींच्या सभेच्या अगदी जवळून चोरट्यांनी एटीएम मशीन लंपास केली. विशेष म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने ठीक ठिकाणी नाके बंदी करण्यात आलेली आसताना ऐटीएम पळवले,त्याचा अजून तपास नाही. त्या आगोदर केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या घरी तीन चोरानी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानी शिताफीने तीनी चोरास पकडले.

 त्यातच आता पोलीस निरीक्षकालाच अडवून लूटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन चोरट्यांनी दोन अंगठ्यांसह 66 हजाराचा मुद्देमाल लंपास करत पोलीस यंत्रणेच्या अब्रूचे धिंडवडे काढले आहेत

कृष्णा उत्तमराव हिस्वनकर वय 56 वर्ष रा. शहानुरवाडी, छत्रपती संभाजीनगर ह.मु. बिंदुसरा पोलिस अधिकारी कॉलनी, बीड असे लुटलेल्या पोलिस निरीक्षकांचे नाव आहे. हिस्वनकर हे छत्रपती संभाजीनगर येथे एसआरपीएफ ग्रुप – 14 येथे बिनतारी संदेश विभागात कार्यरत आहेत. सध्या लोकसभा निवडणूकी च्या अनुषंगाने गेल्या चार दिवसांपासून बीडमध्ये बंदोबस्तासाठी आलेले आहेत. 5 मे रोजी रात्री साडे अकरा वाजता हिस्वनकर हे जिल्हा रूग्णालयाच्या बाजुच्या रस्त्याने बिंदुसरा कॉलनीकडे जात होते. याच वेळी दुचाकीवरून दोन जण आले. त्यातील एकाने हिस्वनकर यांना पकडून ठेवले तर दुसऱ्याने त्यांच्या हातातील दोन अंगठ्या, रोख पाच हजार रूपये असा 66 हजार रूपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. त्यानंतर 7 मे रोजी बीड शहर पोलिस ठाणे गाठत हिस्वनकर यांनी अज्ञात दोन चोरट्यांविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!