• Fri. Sep 11th, 2026

समाजमाध्यमांची रणभूमी.विखारी विधाने.  बीड जिल्ह्य़ात सोशल मीडियावर जातीवादाचा कहर. पोलीस अधीक्षकांना निवेदन व कारवाई करून ही परिस्थिती जैसे थे.

Bybaba maske

May 22, 2024

समाजमाध्यमांची रणभूमी.विखारी विधाने. 

बीड जिल्ह्य़ात सोशल मीडियावर जातीवादाचा कहर.

पोलीस अधीक्षकांना निवेदन व कारवाई करून ही परिस्थिती जैसे थे.

रोखठोक न्युज वार्ताहर 

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सुरवात झाल्यावर व प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी संपुष्टात आल्यानंतर लगेचच समाजमाध्यमांचे रूपांतर राजकीय रणभूमीत झाल्याचे दिसून आले. आचारसंहितेचे कोणतेही बंधन नसलेल्या समाजमाध्यमांवरून वेगवेगळ्या प्रकारे मतदारांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न दिवसभर पाहायला मिळाले. त्यासाठी वापरण्यात येणारे अपशब्द, प्रक्षोभक विधाने, छायाचित्रे, चित्रफिती यांतून तीव्र विखार समाजमाध्यमांच्या पानोपानी उमटत होता.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराची रणधुमाळी शनिवारी समाप्त झाली. रविवारी उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मतदानाच्या दिवशीच्या व्यूहरचनेची उजळणीही करण्यात आली. मात्र, त्याचवेळी समाजमाध्यमांवर प्रचाराचा जोर कैकपटीने वाढल्याचे दिसून आले. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, एक्स अशा सर्वच समाजमाध्यमांवरून 

आपल्या उमेदवाराचा वा पक्षाचा प्रचार करण्यापेक्षाही अधिक भर प्रतिस्पर्धी उमेदवार आणि पक्ष यांची निंदानालस्ती करण्यावर असल्याचे दिसून आले. नेत्यांची बदललेली भूमिका, भाषणे, जुन्या चित्रफिती प्रसारित करून त्यांच्या दुटप्पीपणाकडे बोट दाखवण्याचे प्रकार सुरूच होते. मतदान केंद्रांवरील विशिष्ट समुदायाच्या पेहरावातील गर्दीची छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसारित करून अन्य समुदायांतील मतदारांना चिथावणी देणाऱ्या पोस्टचा दिवसभर धुमाकूळ होता. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या विशिष्ट भाषेतील पत्रकांची छायाचित्रे पसरवून त्याआधारे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न दिसून आले.

प्रतिस्पर्धी पक्षांच्या नेत्यांनी काही वर्षांपूर्वी केलेली भाषणे आणि आताची बदललेली भूमिका यांच्या ध्वनिचित्रफिती शोधून त्या समाजमाध्यमांवर फिरवण्याच्या कामाला रविवारी दिवसभर वेग आला होता. वर्तमानपत्रांत छापून आलेल्या जुन्या बातम्या आणि आताची राजकीय परिस्थिती यातील विरोधाभास सांगून एकमेकांवर हल्ला करण्याची संधी एकाही पक्षाने सोडली नाही.

विखारी विधाने

समाजमाध्यमांवरच्या प्रचारात सर्वात जास्त मराठा विरोधात वंजारी असे शीतयुद्ध चालू असते. पक्षांच्या अधिकृत फेसबुक पेज ऐवजी अनामिक समर्थकांच्या माध्यमातून प्रचार, अपप्रचाराचे हल्ले सुरू होते. उमेदवार ला आपटा, अबकी पार अंतिम संस्कार, यापेक्षा ही अत्यंत घाणेरड्या भाषेत एकमेकाना कंमेट केल्या जात होत्या वाचणाऱ्याला सुद्धा लाज वाटेल अश्या अश्लिल कंमेटचा पाऊस पडत होता.ऐवढा जातीवाद कधीच कोणत्या निवडणूकीत बघायला भेटला नाही.आता तरी कुठे तरी हे थांबले पाहीजे.

निवडून कोण येत या वर ही बरच अवलंबून आहे.चार जुन ला तर सोशल मीडिया बघावे की नाही असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.

baba maske

Related Post

धाराशिव ब्रेकिंग : मराठा आंदोलकांनी जाळली उमरगा तहसीलदारांची खुर्ची!मनोज जरांगे यांच्या उपोषणाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप; आंदोलन पोलिसांच्या ताब्यात, घटनेने एकच खळबळ
केज पोलिसांची मोठी कारवाई! १४.८८ लाखांचा ७४.४३२ किलो गांजा जप्त; आरोपी जेरबंदकेवड गायरान परिसरात छापा; सुनील शिवाजी पवार याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा
खरा मालक अंधारात ठेवून बनावट मालक व बोगस कागदात्राद्वारे प्लॉटचे खरेदी खत केले ; तिघा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!