• Mon. May 25th, 2026

खऱ्या गोपीनाथ मुंडे च्या वारसदाराला कोणी संपवले? मराठा आरक्षणाच्या वादात पंकजा मुंडेचा बळी कोणी दिला? पेटलेल्या वनवेत पंकजा मुंडे ला कोणी आणि का ढकलले? 34 वर्षा नंतर मुंडे घराणे प्रथमच सत्तेपासून दुर.

Bybaba maske

Jun 8, 2024

खऱ्या गोपीनाथ मुंडे च्या वारसदाराला कोणी संपवले?

मराठा आरक्षणाच्या वादात पंकजा मुंडेचा बळी कोणी दिला?

पेटलेल्या वनवेत पंकजा मुंडे ला कोणी आणि का ढकलले?

34 वर्षा नंतर मुंडे घराणे प्रथमच सत्तेपासून दुर.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड लोकसभे साठी पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला पण हा जरी निसटता पराभव वाटत असला तरी वंचित बहुजन आघाडीच्या अशोक हिंगे यांनी 50 हजार व अशोक थोरात या अपक्ष उमेदवाराच्या तुतारी सारख्या दिसणार्‍या पिपाणीला 50 हजार मताधिक्य भेटले तर हा हिशोब लाखा पंर्यत जातो जर हे मतदान बजरंग सोनवणे यांना भेटले असते तर हा पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव ठरला असता.

पण यातील चर्चेची गोष्ट असे की या मराठा आरक्षणाच्या पेटलेल्या वनवेत पंकजा मुंडे ला कोणी आणि का ढकलले? मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाला घेऊन भाजप विरोधात तसेच नाव घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात रणशंक फुकला असताना राज्यात भाजप विरोधात एक सुप्त लाट असताना पंकजाताई यांना लोकसभे साठी गळ घातली गेली,त्यांची ना असताना खोट्या सर्वेचा दाखला देऊन त्यांच्या माथी ही निवडणूक मारली कारण आजच शिंदे गटातील आमदार, मंत्री उघड बोलू लागले आहेत सर्वेच्या नावाने भंपक गोष्टी सांगून आम्हाला उमेदवार बदलायला लावले नाहीतर आमच लोकसभेच चित्र वेगळ असत.बीड जिल्ह्य़ात सुद्धा तेच झाले प्रितम मुंडे या दोन वेळेस च्या खासदार असताना त्यांची उमेदवारी कापली बरे प्रितम मुंडे यांना जरी उमेदवारी दिली असती तरी प्रचार पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनीच केला असता.उलट पंकजा मुंडे यांना बाहेर राहून वेगळी रणनीती करता आली असती जरी प्रितम मुंडे यांची जागा पडली असती तरी विरोधी संक्रमण होते म्हणून जागा पडली असे गृहीत धरले असते.

पण विधानसभेत पंकजाताई चा पराभव झाला असताना त्यांना राखीव खेळाडू ठेवण्या पेक्षा त्यांना मैदानात उतरून त्यांची विकेट का घेतली हा प्रश्न आकलना बाहेरचा आहे.सगळ्यात जास्त सुरक्षित असलेल्या केज व गेवराई या दोन ठिकाणी लिड कमी कसी झाली हे सुद्धा आश्चर्य कारक आहे.पंकजा मुंडे कडे ना आता परळीची विधानसभा राहिली ना बीड लोकसभा मग खऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्या वारसादाराला कोणी संपवले? मुडे घराने 34 वर्षा नंतर प्रथमच सत्तेपासून दुर झाले आहे.

कोणाकडे कधी अन् कोणते पद?

■ गोपीनाथ मुंडे – १९८०, १९९०, १९९५, १९९९, २००४ आमदार, २००९ व २०१४ खासदार

• पंकजा मुंडे – २००९ व २०१४ आमदार

■ डॉ. प्रीतम मुंडे – २०१४ व २०१९ खासदार

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!