• Tue. Aug 25th, 2026

धारुर घाटात ट्रक पलटी होवून एक जण ठार 

Bybaba maske

Jun 8, 2024

धारुर घाटात ट्रक पलटी होवून एक जण ठार 

रोखठोक न्युज वार्ताहर 

धारुर शहरानजीक असलेल्या घाटात आज दि.8 जून शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास खत घेवून जाणारा ट्रक पलटी होवून एक जण ठार झाल्याची दुर्घटना घडली. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर शहरापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 548 सी वर घाटातील  एका अवघड वळणावर शनिवारी (दि.8) सकाळी अपघात घडला. धाराशिवहून माजलगावकडे खताचे पोते घेवून जाणारा ट्रक (क्र. एम एच 25 यु 0251) एका वळणावर ब्रेक निकामी होवून चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झाला. यात ड्रायव्हर व क्लिनर गंभीर जखमी झाले. दोन्ही जखमीना नागरीकांनी तात्काळ धारुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना चालक राहुल चंदनशिवे (वय 36 वर्ष) ठार झाल्याची तर क्लिनर विष्णु सुरवसे (वय 25 वर्ष) पाय फ्रैक्चर असल्याची माहिती मिळाली.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!