केज विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) लढवणार!
रोखठोक न्युज वार्ताहर
लोकसभे नंतर अजित पवार गट अक्रमक झाला असून लोकसभेला कमी जागेवर तडजोड केल्या नंतर आता तसी तडजोड विधानसभेत करणार नाही.त्यामुळे बीड जिल्ह्य़ातील राष्ट्रवादी कॉग्रेस ने लढवलेल्या व आता पर्यंत जिंकलेल्या जागा याचा अभ्यास करणे चालु आहेत त्यात बीड,माजलगाव आष्टी- पाटोदा,परळी व केज या अग्रभागी आहेत.केज सोडता बाकीच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस चे रनिंग आमदार आहेत.तर केज ही प्रत्येक वेळेस राष्ट्रवादी ने जिंकलेली जागा आहे.ही जाग पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेची केली आहे
त्यामुळेच केज विधानसभेची जागा अजित पवार गट लढवणार असल्याच बोलल जात आहे.कारण या जागेवर नैसर्गिक रित्या आमचा हक्क असल्याची चर्चा झाल्याच बोलल जात आहे.यात उमेदवाराची चाचपणी झाली असुन उमेदवार बीड जिल्ह्यातील प्रतिष्ठित उद्योजक असल्याच बोलल जात आहे.काही प्रमाणात मागासवर्गीय मताची नाराजी व वंचित फॅक्टर कमी करण्याच्या अनुषंगानेच या उमेदवाराची चाचपणी केल्याच बोलल जात आहे व यास बीड जिल्ह्य़ातील मोठ्या राष्ट्रवादीच्या नेत्याने सहकार्य करत मोठ्या प्रमाणात मदत करण्याच आश्वासन दिल आहे.त्यामुळेच अजित पवार गट ही जागा लढवणार असे बोलले जात आहे.
