तत्कालीन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आर.एम. शिंदे यांनी पालकमंत्र्यांना अंधारात ठेवून नियमबाह्य 107 घरकुलास घेतली मंजुरी

रोखठोक न्युज
बीड प्रतिनिधी – ततत्कालीन बीड जिल्ह्यातील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आर.एम.शिंदे यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील रमाई घरकुल योजनेतील जिल्ह्याला उद्दिष्ट असलेले प्रस्ताव आचारसंहितेच्या अगोदर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मंजूर करण्यात आले.परंतु बीड तालुक्यातील ग्रामीण उद्दिष्ट व्यतिरिक्त 107 रमाई घरकुल योजनेची पालकमंत्री यांची दिशाभूल करून मंजुरी घेतली. पंचायत समिती बीड मार्फत मंजुरीसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नसतानाही अंधारात ठेऊन दिशाभूल करून मंजुरी घेतली.
रमाई घरकुल योजनेचे प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभेत मंजूर करून सदर प्रस्ताव पंचायत समितीला पाठवले जातात त्यानंतर पंचायत समिती त्या प्रस्तावाची छाननी करते. त्यानंतर हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पंचायत समिती कडून समाज कल्याण सहाय्यक आयुक्त बीड पाठवले जातात. व जिल्ह्याचे पालकमंत्री या कमिटीचे अध्यक्ष असतात परंतु आर.एम. शिंदे व नितिन राठोड यांनी बीड पंचायत समिती मार्फत प्रस्ताव दाखल नसतानाही.स्वतःचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी बोगस लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी मिळवून दिली. मागासवर्गीय प्रवर्ग सोडून इतर लाभार्थी असण्याची शक्यता आहे. याबाबत बीड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी 15 मे 2024 रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण बीड यांना पत्र लिहिले असून 107 लाभार्थ्यांना कुठल्या कागदपत्राच्या आधारे अथवा या कार्यामार्फत विहित नमुन्यात प्रस्ताव सादर करण्यात आलेले नसतानाही त्यांच्या नावे घरकुल मंजूर केलेले आहे. यामध्ये मोठा आर्थिक गौरव्याहार झाल्याची शक्यता दिसून येत आहे. सदरील लाभार्थ्यांचे प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती ला प्राप्त नव्हते. व या कार्यालया मार्फत आपल्याकडे प्रस्ताव सादर न करता थेट घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे त्या लाभार्थ्यां संदर्भात पुढील कार्यवाही याबाबत वरिष्ठ पातळीवर पत्र व्यवहार केला आहे. याची प्रत त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड व प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बीड यांना गट विकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांनी दिली आहे.
अशाप्रकारे आर.एम.शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रकारच्या अनियमित्ता केल्या आहेत. या प्रकरणात त्यांची विभागीय चौकशी देखील चालू आहे.सदरील प्रकारात त्यांच्यावर योग्य ती कारवाई कधी होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
