जुन्या भांडणाची कुरापत काढून प्राणघातक हाल्ला.पायाची नडगी डोके फोडले.
सहा जणांनी केला प्राण घातक हल्ला.
रोखठोक न्युज वार्ताहर
आंबेजोगाई येथे जुन्या भांडणाचे कुरापत काढून सामाजिक कार्यकर्ते जहांगीर पठाण यांच्यावर सहा जणांनी प्राण घातक हल्ला केल्याची घटना सोमवारी दुपारी आंबेजोगाई शहरात घडली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी फरार आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, येथील सामाजिक कार्यकर्ते व सदर बाजार येथे रहिवाशी शराफत मिरखान तय्यब मिरखान उर्फ जहांगीर पठाण हे 11/ 6/ 2024 रोजी बारा वाजता एक विवाह समारंभ आठपुण केशवनगर मार्गे आपल्या घराकडे येत असताना. खोलेश्वर महाविद्यालयाच्या मागील गेट जवळ सोहेल कुरेशी राहणार बाराभाई गल्ली, आकाश नेहरकर उर्फ बिलाल राहणार गांधीनगर सय्यद अहमद राहणार झाले गल्ली, मजेत कुरेशी उर्फ माजू राहणार बाराभाई गल्ली आंबेजोगाई जिल्हा बीड नुमान कु राहणार बाराभाई गल्ली व अनोळखी इसमाने शराफत मिरखान तय्यब मिरखान उर्फ जहांगीर पठाण यास पाठीमागून येऊन त्याची लाल रंगाची कार जहांगीर यांच्या मोटार सायकल ला आडवी लावून आरोपी सोहेल कुरेशी याने जहांगीर यास तू खूप माजला आहेस तुझ्या भावाने आमच्यावर केस केली तू आज आमच्या कशाचा सापडलास आम्ही तुला जीवन सोडणार नाहीत असे म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात लोखंडी रोडने टांबीने मारले तर आकाश नेहरकर यांनी त्याच्या हातातील कोयत्याने मोठीने डोक्यात पाठीमागून जोरात मारले आरोपी सय्यद मोहम्मद याने त्याच्या हातातील लोखंडी राॅडने उजव्या पायाच्या नडगीवर जोरात मारले व आरोपी माजेद खुरेशी याने त्याच्या हातातील कोयत्याने डाव्या पायाच्या नडगीवर मारून गंभीर जखमी केले या सर्वांसह एका अनोळखी इसमाने लाथा बुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली व जहांगीर यांचा मोबाईल घेऊन जमिनीवर आटवून व मोटरसायकलचे नुकसान केले म्हणून सोहेल कुरेशी रा. बराबाई गल्ली आंबेजोगाई आकाश नेहरकर उर्फे बिलाल रा. गांधीनगर, सय्यद मंहमद रा. झारे गल्ली ,माजेद कुरेशी उर्फ माझे रा. बाराभाई गल्ली आंबेजोगाई जिल्हा बीड नुमान कुरेशी रा बारावी दिल्ली व एक अनोळखी इस माय विरुद्ध शराफत मीरखा तय्यब मिर्खान उर्फ जहांगीर पठाण यांच्या फियादीवरून आंबेजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 252 २०२४ कलम 307 326 324 323 341 427 143 147 148 149 504 506 भादविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरारी आहेत अधिक तपास आंबेजोगाई शहर पोलीस करत आहेत.
