• Fri. Apr 24th, 2026

डोणगाव फाट्यावर ओबीसींचा रस्ता रोको,टायर्स जाळून महामार्ग आडवला 

Bybaba maske

Jun 22, 2024

डोणगाव फाट्यावर ओबीसींचा रस्ता रोको,टायर्स जाळून महामार्ग आडवला 

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील ओबीसीं बांधव आक्रमक झाला आसुन वडिग्रोद्री येथील लक्ष्मण हाके यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणास समर्थनार्थ म्हणून महाराष्ट्रात वेगवगळ्या ठिकाणी रस्ता रोको करण्यात येत आहे.ओबीसीं बांधव मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरत असून आज केज तालुक्यातील केज -बीड महामार्ग आडवण्यात आला.रस्त्यावर टायर्स जाळून वाहतूक अडवण्यात आली होती तसेच ओबीसी समाज मोठ्या प्रमाणावर घोषणा देत होते.महाराष्ट्रात ओबीसींचे हे अंदोलन वाढत चालले आहे.लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाची लवकर दखल घ्यावी अशी मागणी ओबीसीं बांधव घेत आहेत.तसेच सगेसोयरेचा जिआर तात्काळ खारीज करावा अशी मागणी केली जात आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!