• Wed. Apr 29th, 2026

जिल्हा परिषद सदस्य,उपाध्यक्ष साखर कारखानदार ते खासदार. शेतकरी पुत्र बजरंग बप्पा एक वादळ!!

Bybaba maske

Jul 6, 2024

जिल्हा परिषद सदस्य,उपाध्यक्ष साखर कारखानदार ते खासदार.

शेतकरी पुत्र बजरंग बप्पा एक वादळ!!

बाबासाहेब मस्के

केज मतरसंघात 90 च्या दशकात राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष म्हणून झालेली राजकीय सुरुवात आज बीड जिल्ह्याचा खासदारा पंर्यत येऊन पोहोचला.बंजरग सोनवणे हे केज तालुक्यातील आनंदगाव सारणी या जोडगावातील सारणी येथील शेतकरी कुटुंबातील जन्म हलाक्याच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन गावात आले व गावच्या राजकारणात उडी घेतली.गावची ग्रामपंचायत लढवून उपसरपंच झाले तेथून घेतलेली बंजरग उडी त्यानंतर तालुक्याच्या राजकारणात प्रवेश केला गावातील व गावा शेजारील तरूण युवंकाचा ताफा घेऊन पहिल्यांदाच स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या नेतृत्वात केज विश्रामगृहात तालुकाध्यक्ष पद देण्यासाठी मिंटीग होती त्यात स्वतःला तालुकाध्यक्ष पद घेण्यासाठी युवकांचा ताफा घेऊन आले व मातब्बर इच्छुकाांना मात देऊन राष्ट्रवादी काँग्रेस चे केज तालुकाध्यक्ष झाले.त्यानंतर त्यांनी माघे वळून बघीतले नाही.

जिल्हा परिषद ची निवडणूक लागली असता येवता मतरसंघात एक वादळ निर्माण केल व पहिल्याच प्रयत्नात जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आले.ते आजतागायत जिल्हापरिषद सदस्य आहेत.येवता जिल्हापरिषद निवडणूक आज ही आठवते प्रत्येक दोनचाकी,चारचाकी गाडीवर वादळ लिहिलेल्या गाड्या प्रचारात फिरत असे बंजरग नावाच वादळच अक्षरशः तयार झाले होते.त्यानंतर युसुफवडगाव, चिंचोली अश्या मतरसंघातुन ते जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून येत राहिले व आपल्या पत्नीला ही जिल्हापरिषद सदस्य म्हणून निवडून आणले व जिल्हापरिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष ही झाले.शिक्षण,आरोग्य असे महत्वाचे सभापतिपद सांभाळले त्याच्या सभापतिपद काळात गावा गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राना निधी मंजूर करून मेकओव्हर केला.चांगली आरोग्य सुविधा दिल्या आचानक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन बंजरग पॅटर्न निर्माण केला. जिल्हापरिषद सदस्य असतानाच त्यांनी येडेश्वरी साखर कारखान्याची निर्मिती केली व यशस्वी पणे चालवला त्याच बरोबर बार्शी येथील बंद साखर कारखाना चालवण्यास घेऊन तो ही यशस्वी चालवत आहेत.

 त्या नंतर राष्ट्रवादीकडून ते प्रितमताई मुंडे यांच्या विरोधात 2014 ची लोकसभा लढवली पण 5 लाख मते घेऊन ही ते पराभूत झाले.येडेश्वरी साखर कारखान्यात पुर्ण पणे लक्ष केंद्रित करून शेतकर्‍याच्या ऊसाला सर्वात जास्त भाव दिला.अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ झाली शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस फुटली अश्यातच लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि आयता वेळेस अजित पवार गट सोडून राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला ऐवढा मोठा निर्णय म्हणजे एक राजकीय आत्महत्या होती पण ती निडर पणे निवडणूक लढवणार या वर ठाम राहिले.भाजप च्या पंकजाताई मुंडे समोर निवडणूक लढवली व निवडून आले.उपसरपंच पदा पासुन घेतलेली बंजरगी उडी  खासदारा पर्यंत येऊन थांबली आहे असे नव्हे ती कुठ पंर्यत जाते ते बघण्यासारखे असेल अश्या या अपराजित नेतृत्व असलेल्या बंजरग सोनवणे यांचा जन्मदिवस आज पुर्ण महाराष्ट्रातून त्याच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!