केज तालुक्यात ऑनर किंलीग ची घटना!!
लव्ह मॅरेज केले म्हणून सहा महिण्याच्या गरोदर मुलीला वडीलासह नातेवाईकांनी विष पाजले
वडील आणि चुलता व काकी विरुध्द केजमध्ये गुन्हा दाखल
रोखठोक न्युज वार्ताहर
केज दि.४ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील गदळेवाडी येथे लव्ह मॅरेज का केले म्हणून एका विवाहीत मुलीला व तिच्या पतीला शेतात गाठून विषारी औषध पाजल्याची घटना घडली असुन विवाहीत मुलगी सहा महिन्याची गरोदर असुन मुलीच्या फिर्यादी वरुन वडील आणि दोन चुलते व दोन काकी विरोधात केजमध्ये गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा पुढील तपास पो.ना.बाळू सोनवणे हे करत आहेत.
केज तालुक्यातील गदळेवाडी येथील पायल अजय नाईकवाडे वय १९ वर्षे या विवाहीत महिला व तिचा पती अजय नाईकवाडे हे दोघे पती पत्नी शेतात खुरपणी करण्यासाठी गेली असता विवाहीत मुलीच्या वडीलांनी व चुलता चुलत्यांनी पायलला शेतात गाठून तिला म्हणाले की तू लव्ह मॅरेज करुन आमच्या विरोधात केलेली केस माघे घे तू आमची इज्जत घातली असे म्हणत तिच्या पतीला धरुन विषारी औषध पाजले व पायल ही सोडवण्यासाठी आली असता तिलाही विषारी ओषध पाजून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.घटणास्थळा वरुन या दोघांना एका रुग्न वाहीकेने अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात अॅडमीट केले तेथे उपचार सुरु असताना पोलीसांनी घेतेल्या जवाबा नुसार पायल अजय नाईकवाडे हिच्या फिर्यादी वरुन ग.र.न.३६३ नुसार वडील व दोन चुलते व दोन चुलत्या विरोधात केजमध्ये गुन्हा दाखल झाला असुन या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक बाळू सोनवणे हे करीत आहेत.
