• Thu. Jun 25th, 2026

ऊसतोड मजुराचा दिवसाढवळ्या खून.

Bybaba maske

Jul 7, 2024

ऊसतोड मजुराचा दिवसाढवळ्या खून.

रोखठोक न्युज वार्ताहर 

बीड तालुक्यातील बोरखेड गावातील इस्माईल सत्तार तांबोळी याने ऊसतोडी संपल्यावर गावात पमंचरचे दुकान चालू केले होते. ऊसतोडीची उचल बाकी असल्याने मुकादम व काही लोकांनी त्याच्या दुकानावर जाऊन पैशाची मागणी केल्याने बाचाबाची झाल्याचे गावातील नागरिकांनी पाहिले होते. त्यानंतर त्याला लिंबागणेश येथील एका धाब्याच्या मागे नेऊन ठार मारल्याचे सांगण्यात येते. सायंकाळी महीला शेतामधून परतत असताना काही मृतदेह पाहिला असता आरडा ओरड करत जवळ असलेल्या पंप चालकालां सांगून याची माहिती नेकनुर पोलिसांना दिल्यावर पोलीसानी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असता म्रत बोरखंड येथील असल्याची माहिती मिळाली असून इन कॅमेरा शिवविच्छेदनासाठी मृतदेह आंबेजोगाईला पाठवण्यात आला. दिवसाढवळ्या खून झाल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी इब्राहिम तांबोळी यांच्या फिर्यादीवरून तिघा विरोधात निघून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या खुनाचा तपास पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोसावी करत आहेत.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!