• Thu. Jun 25th, 2026

मराठाआरक्षण व शांतता जनजागृती रॅली ११ जुलै ! अखंड बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांनी उपस्थित रहावे – रोहन गलांडे पाटील

Bybaba maske

Jul 10, 2024

मराठाआरक्षण व शांतता जनजागृती रॅली ११ जुलै !

अखंड बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांनी उपस्थित रहावे – रोहन गलांडे पाटील

रोखठोक न्युज वार्ताहर 

विश्वासघातकी सरकार सगेसोयरे कायदाची अंमलबजावणी करत नाही व आपल्या मराठा आरक्षणावर कुठलाही ठोस निर्णय घेत नाही.आपले मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली दि.11 जुलै २०२४ रोजी सकाळी ११ वाजता मार्ग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक आयोजित केली आहे तरी अखंड मराठा समाज, बीड जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली मध्ये उपस्थित रहावे असे आवाहन समाज बांधव रोहन गलांडे पाटील यांनी केले आहे. आपल्या लेकरांच्या न्याय हक्कासाठी दि. ११ जुलै २०२४ रोजी ठिक सकाळी ११ वा. मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली ठेवली आहे तरी बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांनी आपल्या प्रत्येक गावातुन कमीत कमी दोन गाड्या जिप,पीकप, स्कारपीओ आशा चार चाकी दोन चाकी गाड्या तरी घेऊन निर्णय महाबैठकीस उपस्थित रहावे व आपली काळजी घेण्यासाठी पाऊसाळ्याचे दिवस असल्याने पाऊसा पासुन बचाव करण्यासाठी रेन कोट इतर साहित्य पाऊसा पासुन बचाव करण्यासाठी सोयीनुसार आपली सोय आपल्या गाडी सोबत करायची आहे व लाखोंच्या संख्येने निर्णय महाबैठकीस लाखोंच्या संख्येने मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रोहन गलांडे पाटील यांनी केली आहे . तरी बीड जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील आमरण उपोषणकर्ते, साखळी उपोषणकर्ते, मराठा सेवक, स्वयंसेवक, सभा आयोजक-नियोजक, डॉक्टर, वकील, अभ्यासक, शेतकरी, कष्टकरी आणि सर्व मराठा बांधव,मराठा आरक्षण जनजागृती व शांतता रॅली मध्ये लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रोहन गलांडे यांनी केले आहे.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!