• Thu. Jun 25th, 2026

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?

Bybaba maske

Jun 25, 2026

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी?

मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज नगरपंचायतीतील कथित घरकुल घोटाळा प्रकरणात नाव आल्याने मानसिक तणावाखाली वावरत असलेले नगरपंचायतीचे कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची दुःखद घटना घडली आहे. त्यांच्या निधनामुळे केज शहरात हळहळ व्यक्त होत असून या प्रकरणातील कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरकुल घोटाळा प्रकरणात अनेक अधिकारी व संबंधितांची नावे चर्चेत असताना चतुर्थश्रेणी कर्मचारी असलेल्या भिमराव मस्के यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणातील कथित मुख्य जबाबदारांवर किंवा तत्कालीन मुख्याधिकारी निता अंधारे यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई अथवा गुन्हा दाखल न झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर भिमराव मस्के हे गेल्या काही महिन्यांपासून प्रचंड मानसिक तणावात होते, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. “कारण नसताना आपले नाव घोटाळ्यात ओढले गेले, मोठे मासे मोकाट राहिले आणि सामान्य कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली,” अशी खंत ते वारंवार व्यक्त करत असल्याचे बोलले जात आहे.

आज अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नगरपंचायत कर्मचारी वर्गातही शोककळा पसरली आहे.

आता पर्यंत एक ही अटक नाही.

“राजकीय व्यवस्थेने घेतलेला हा बळी आहे. सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. ५० ते ६० लाख रुपये घेऊन राजकीय नेते खुश आहेत, मात्र सामान्य कर्मचाऱ्यांचे काय? आज पर्यंत तिन महिने झाले घरकुल घोटाळ्यातील एक ही आरोपीस अटक केले नाही तत्कालीन सीओ निता अंधारे मॅडम यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही, हा संशोधनाचा विषय आहे. 

भिमराव मस्के यांच्या निधनानंतर आता पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे की, घरकुल घोटाळ्यातील वास्तविक जबाबदारांवर कारवाई होणार का, की केवळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाच बळीचा बकरा बनवले जाणार?

भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!