• Tue. Aug 25th, 2026

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश

Bybaba maske

Jun 26, 2026

केज तहसील कार्यालयात भिमराव मस्के यांचामृतदेह आणून आंदोलन; ‘खरे आरोपींवर गुन्हे दाखल करा’ची मागणी

घरकुल घोटाळ्याच्या मानसिक तणावातून कर्मचाऱ्याचा मृत्यू? संतप्त नातेवाईकांचा तहसील कार्यालयात आक्रोश

रोखठोक न्यूज वार्ताहर 

केज नगरपंचायतीतील घरकुल घोटाळा प्रकरणात नाव आल्याने मानसिक तणावात असल्याचा आरोप करत नगरपंचायतीचे कर्मचारी भिमराव शामराव मस्के यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांनी गुरुवारी थेट तहसील कार्यालय गाठत तीव्र आंदोलन केले. “खऱ्या आरोपींवर गुन्हे दाखल करा” या मागणीसाठी भिमराव मस्के यांचा मृतदेह तहसील कार्यालय परिसरात आणण्यात आला. या घटनेमुळे केज शहरात मोठी खळबळ उडाली.

भिमराव मस्के यांच्या मुलाने विक्रांत मस्के यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. नगरपंचायत केज येथील घरकुल योजनेतील आर्थिक अपहार प्रकरणात आपल्या वडिलांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव गुंतविण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते. सततच्या भीतीमुळे त्यांची प्रकृती खालावली होती आणि अखेर २४ जूनच्या मध्यरात्री त्यांचे हृदयविकाराच्या झटका येऊन निधन झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात तत्कालीन निता अंधारे,लक्ष्मण जगताप,मिलिंद सावंत,असद खतीब व विद्यमान अजित ढोपे काही अधिकारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांची नावे घेत त्यांच्या भूमिकेची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच घरकुल घोटाळ्यातील “मोठ्या माशांना” वाचवून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनविण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणाची दखल घेत तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, केज यांनी संबंधित निवेदन पोलीस निरीक्षक, केज यांच्याकडे पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पाठविले आहे. तसेच जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी आणि मुख्याधिकारी यांनाही प्रत पाठविण्यात आली आहे.

या घटनेनंतर केजमधील घरकुल घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळणार का आणि निवेदनातील आरोपांवर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!