• Thu. Jun 25th, 2026

महावितरण मधील कंत्राटी कामगारावर उपासमारीची वेळ ! १६ तारखे पासून ४२ कामगारांचे आमरण उपोषण करणार

Bybaba maske

Jul 13, 2024

महावितरण मधील कंत्राटी कामगारावर उपासमारीची वेळ !

१६ तारखे पासून ४२ कामगारांचे आमरण उपोषण करणार

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील हातावर पोट असणारे अनेक महावितरण कंत्राट कामगारावर तीन महीण्या पासुन पगार नसल्याने उपास मारीची वेळ आली आहे त्यामुळे १६/०७/२०२४ पासुन ४३ कंत्राट कामगार बीड मंडळ कार्यालय येथे अमरण उपोषणाला बसणार आहेत याविषयी सविस्तर वृत्त असे की सर्व वीज कंत्राटी कामगार केज विभाग यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे की कि आम्हांला माहे,एप्रिल, में, जून, तीन महिन्याचे पगार (पेमेंट) अजून झाले नाही. ३महिने आमची पगार झाली नाही आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ३ महिने पगार नसल्यामुळे आम्ही आमच्या घरात किरान भरु शकत नाही ३ महिने पगार नसल्याने घरातील व्यक्ती आजारी पडल्यावर आमच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत ३ महिने पगार नसल्याने मुलांच्या शिक्षनाचा खर्च करू शकत नाही ३ महिने पगार नसल्याने स्वतःच्या तबियत ची काळजी घेऊ शकत नाही ३ महिने पगार नसल्याने आई वडिलांना मेडिकल गोळ्या देऊ शकलो नाही एक आवर्जून विनंती, आम्हा कामगार यांच्या घरात कोणाचे आई वडील आजारी, तर कोणाचे बायकोचा दवाखाना तर कोणाच्या लेकराचं शिक्षण तर कोणाचं पोटच फक्त या कामावर अवलंबून आहे, म्हणून साहेबाना विनंती आहे लवकर आमची पगार (पेमेंट) करावी आपल्या माहितीस्तव असे निवेदन देऊन यावर काही दखल घेण्यात नाही आली तर आम्ही सर्व कामगार केज सब डिव्हिजन मध्ये पासुन दि. १३/०७/२०२४ पासून काम बंद आंदोलन करणार आहोत. व १६/०७/२०२४ पासून मंडळ कार्यालय बीड या ठिकाणी आमरण उपोषण केज सब डिव्हिजन मधील ४२ कामगार करणार आहोत जो पर्यंत तीन महिन्याचे पेमेंट मिळत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहील यामध्ये काही अनुसूचित प्रकार घडला तर याची सर्वस्व जबाबदारी आपल्या कार्यालयाचे अधिकारी प्रशासनानाकडे असेल. आज आमच्या परिवारावर आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे असे निवेदनाद्वारे ४३ कंत्राट कामगारांनी म्हटले आहे तरी संमंधीत प्रशासनाने कंत्राट कामगारांच्या निवेदनाची दखल घ्यावी अशी मागणी कंत्राट कामगारांनी निवेदनाद्वारे केली आहे.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!