महामार्गाच्या कामासाठी वटवृक्षाची कत्तल!
नव्या रोपाची लागवड करण्याकडे वनविभागाचा अक्षम्य दुर्लक्ष
रोखठोक न्युज वार्ताहर
अंबाजोगाई केज बीड या महामार्गाचे काम करण्यासाठी महाकाय वटवृक्षाची कत्तल करण्यात आली. झाडांची कत्तल झाल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा ओसाड दिसत आहेत. पावसाळा सुरू झालेला आहे. यामध्ये नव्या रोपाची लागवड करण्याकडे वनविभागाचा कानाडोळा केला जात आहे. तरी यावर्षी तरी नव्या रोपांची लागवड करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. रस्त्याच्या कामासाठी वटवृक्षाची कत्तल करण्यात आली. कत्तल झालेल्या वटवृक्षांनी आपले डोळे मिटले आहेत. त्यांना पुनर्जीवित करता आले असते रस्त्याच्या बाजूला पुनरोपण करता आले असते मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या बदल्यात रस्त्याच्या दुतर्फा रोपांची लागवड करण्यात येणार असा फतवाही निघाला.
चौकट :-
वृक्षतोड खुलेआम चालू हैवनीकरण सध्या सर्वत्र वृक्षतोड खुलेआम चालू आहे वनीकरण विभाग पाहतो आहे. वृक्षलागवड केवळ कागदावरच होते शतकोटी वृक्ष लागवडीचा बोजवारा उडालेला सर्वश्रुत आहे. या प्रकरणी वृक्ष मित्रांनी यासाठी मंत्रालयात मागणी केली मात्र याकडे कोणी लक्ष घातले नाही. परिणामत सर्व वृक्षांची कत्तल झाली आहे. सध्या रस्त्याच्या दुतर्फा या वृक्षांचे अवशेष पडलेले आहेत. याकडे बघून नवी पालवी कधी फुटणार कधी उगवणार आणि पर्यावरणाचे संवर्धन कधी होणार असा प्रश्न उभा आहे याची दखल घेऊन वृक्षलागवड तत्काळ व्हावी अशी मागणी केली जात आहे.
चौकट:-
दुतर्फा वृक्षांची लागवड करावी प्रत्यक्षदर्शी अद्यापपर्यंत कोणतेही रोप लावले गेले नाही. यामुळेच विकासाकडे जाणारे महामार्ग हे विनाशाकडे जातात की काय असा प्रश्न निसर्ग प्रेमींमध्ये निर्माण झाला आहे. वृक्षाचे पुनर्जीवन करावे व रस्त्याच्या दुतर्फा हा रस्त्याची लागवड करावी अशी मागणी केली जात आहे. मागील वर्षों काही रोपे लावण्याचा दिखावा करण्यात आला मात्र प्रत्यक्षात एकही रोप जगलेले नाही.
