युसूफवडगांव पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्याचा सुळसुळाट पोलिस मात्र हफ्ते घेण्यात मश्गुल.
वर्षभरात एकही कारवाई नाही?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यातील युसूफवडगांव येथील पोलिस स्टेशन हे बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पोलिस स्टेशन असुन या पोलिस स्टेशनच्या हद्दीत ५९ गावांचा समावेश असुन त्याचे बरोबर सर्वात मोठी हद्द असलेले पोलिस ठाणे म्हणुन यांची ख्याती आहे.त्यामुळे याठिकाणी बदली करून घेण्यासाठी अधिकारी वाटेल ती रक्कम देण्यासाठी तयार असतात अशा या पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या महिन्यापासुन अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आहे मात्र याकडे पोलिसांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत आहे.
युसूफवडगांव पोलिस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे तेजीत असुन हद्दीत सर्वत्र ठिकाणी अवैध धंद्याचा सुळसुळाट वाढला आहे.गावोगाव मटका बुकी, अवैध गुटखा विक्री व पार्सल तसेच अवैध दारू विक्री व दारू पार्सल मोठ्या प्रमाणावर होत आहे.या मटक्या व दारूमुळे कित्येकांच्या संसाराची राखरांगोळी होत आहे.तरूण मुलांना यांचे व्यसन लागुन ते व्यसनाधीनतेच्या आहारी गेले आहेत.यामुळे युवी पीढी बरबाद होण्याच्या मार्गावर आहे पण याचे मात्र पोलिस प्रशासनाला काही घेणे देणे नाही.त्यांना फक्त महिन्यांकाठी या अवैध धंद्यावाल्याकडुन येणाऱ्या हप्त्याची चिंता आहे.कारण यांच्यावर कारवाई करावी तर महिन्याकाठी येणारा मलिदा आपल्या मिळणार नाही म्हणून ते देखील याकडे कानाडोळा करतात कारण एक विचार जर केला तर या ५९ गावांमध्ये प्रत्येक ठिकाणी ३/४ अवैध धंदे वाले असतात मग यांच्याकडून तर महिन्याकाठी एकत्र केला तर लाखो रुपयांचा हप्ता या मिळतो.इतेकच नव्हे तर पोलिस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी व ती परत किंवा समेट घडल्यानंतर पण पैसे लागतात रक्षण करते जर असे वागत असतील तर मग सर्वसामान्य जानतेने कुठे जायचे असा प्रश्न पडतो.
