सरपंचांनी भ्रष्टाचार केल्यास तुरुंगवारी अपहाराच्या तक्रारींची संख्या पाहता शासनाने निर्गमित केला निर्णय.
ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, लिपिक, कर्मचारी यापैकी कोणीही अथवा सर्वजणावर होऊ शकते तुरूंगवास
रोखठोक न्युज वार्ताहर
सरपंच गावाचा प्रथम नागरिक असण्याबरोबरच गाव पुढारीही असतो. गावाच्या विकास कामात भ्रष्टाचार होत असून, त्यात सरपंच केंद्रस्थानी राहत असल्याच्या अनेक तक्रारी शासन प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. यामुळे सरपंच पदाची प्रतिमा मलीन होत आहे. सरपंचाने भ्रष्टाचार केल्यास आता थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. तसा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, त्यासंदर्भात आदेशही काढण्यात आले – आहेत. गावोगावी ग्रामपंचायतीं कडून शासकीय योजना राबवीत असताना भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत. असे प्रकार गंभीर स्वरुपाचे असल्याने प्रशासनाने आता फौजदारी कारवाईबरोबरच अपहार केलेली रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले आहेत. या गुन्ह्यात जबाबदार संबंधित सरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, लिपिक, कर्मचारी यापैकी कोणीही अथवा सर्वजण चौकशी अंती दोषी आढळल्यास संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सरपंच आणि ग्रामसेवक या कर्तव्यदक्ष अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या
संगनमताने बीड जिल्ह्यातील अनेक गावांची वाट लागल्याच्या तक्रारी शासन दरबारी दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारचा विविध प्रकारचा निधी : आता थेट ग्रामपंचायतींना येत असल्याने. निधीचा गैरवापर होण्याचे प्रकार वाढत असल्याच्या हजारावर तक्रारी झाल्या आहेत. ग्रामविकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत एक महिन्यात चौकशी करावी विभागीय चौकशीत गुन्हा घडल्याबाबत निष्कर्ष काढण्यात आल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच ज्या प्रकरणात कोणतीही चौकशी झालेली नाही. अशा प्रकरणी संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी करावी. चौकशी एक महिन्यात पूर्ण करून अहवाल सादर करणे अनिवार्य असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. एखाद्या ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाने नोकरी लागल्यापासून नोकरीच्या १० वर्षांनंतर भ्रष्टाचार केला असेल तर त्याच्या नोकरीच्या पहिल्या दिवसापासून तपास करण्याबाबतचा निर्णयदेखील ग्रामविकास मंत्रालयाने घेतला असल्याने प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
