• Thu. Jun 25th, 2026

मराठा आरक्षण, तीर्थक्षेत्र निधी साठी आज अमर उपोषण ! अमरण उपोषना दरम्यान मेलो तर बांधकाम विभाग, प्रशासन जबाबदार – रोहन गलांडे पाटील

Bybaba maske

Jul 24, 2024

मराठा आरक्षण, तीर्थक्षेत्र निधी साठी आज अमर उपोषण !

अमरण उपोषना दरम्यान मेलो तर बांधकाम विभाग, प्रशासन जबाबदार – रोहन गलांडे पाटील

रोखठोक न्युज वार्ताहर 

मराठ्यांचे दैवत श्री. मनोज जरांगे पाटील हे २० जुलै २०२४ पासून आंतरवाली-सराटी जि. जालना या ठिकाणी आमरण उपोषणास बसणार आहेत.तरी मराठ्यांचे दैवत श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या विषयी महाराष्ट्र राज्य शासनाची भूमिका उदासिनतेची दिसून येत आहे.तरी मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या २० तारखे पासुन सुरू होणाऱ्या उपोषणाची दखल घेऊन राज्य सरकारने केलेल्या मराठा समाजाच्या सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात दि.२४/०७/२०२४ रोजी श्री संत नामदेव महाराज सभागृह येथे सकाळी १० वाजता रोहन गलांडे पाटील आमरण उपोषणाला बसणार आहे मराठ्यांचे दैवत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील असे निवेदनाद्वारे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे. तसेच चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज मंदिरासाठी तीर्थक्षषासाठी ५० लाख रुपये मंजूर झालेल्या निधीचे वितरण करून श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्राचे काम करु असे लेखी आश्वासना नंतर उपोषणाला स्थगिती देण्यात आली परंतू उपोषणाला स्थगिती देऊन ऐक महीना उलटुन सुध्दा काम सुरू केले नसल्याने परत २४/०७/२०२४ रोजी अमरण उपोषन सुरू करण्यात येणार आहे जो पर्यंत कामाला प्रेत्येशात कामाला सुरुवात केली जात नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे असे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ केज तालुकाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे .

चौकट:

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मुंडे यांनी लेखी आश्वासन देऊन श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र विकास कामाला सुरुवात केली नाही तरी यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!