• Thu. Jun 25th, 2026

केजमध्ये मोबाईल चोरणाऱ्या तीन महिला पोलीसांनी घेतल्या ताब्यात.

Bybaba maske

Jul 24, 2024

केजमध्ये मोबाईल चोरणाऱ्या तीन महिला पोलीसांनी घेतल्या ताब्यात

रोखठोक न्युज वार्ताहर 

 शहरातील आठवडी बाजारात गर्दीचा फायदा घेऊन महिलांची नजर चुकवून मोबाईल चोरणा-या धाराशिव जिल्ह्यातील तीन महिला केज पोलीसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर केज पीलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

केज शहरातील, मंगळवार पेठ येथे मंगळवारचा आठवडी बाजार भरतो या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी असते. यावेळी फरीदा सरवर सय्यद वय ३० वर्षे रा. कळंब रोड केज या आठवडी बाजार करत असताना त्यांची नजर चकवून त्यांच्या पर्स मधील रेडमी कंपनीचा दहा हजार पाचसे रुपये किमंतीचा मोबाईल चोरत असताना तीन महिला आरोपी चंदाबाई उत्तम शिंदे, आक्काबाई भाऊराव शिंदे, ललीता बबन काळे सर्व रा. जयभवानी साखर कारखाना ढोकी ता. कळंब जि धाराशिव या महिला आरोपीना महिला पोलीस कर्मचारी जाधव मॅडम, प्रकाश मुंडे, चौधरी, सोपने या पोलीस कर्मचा- यांनी महिलांना ताब्यात घेऊन केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

baba maske

Related Post

केज घरकुल घोटाळ्याच्या छायेत आणखी एक बळी? मानसिक तणावात असलेल्या नगरपंचायत कर्मचारी भिमराव मस्के यांचे हृदयविकाराने मृत्यू; जबाबदार कोण?
भांडण सोडवायला गेला, पण मृत्यूच्या दाढेत ढकलला गेला!टाकळीतील तरुणावर चाकू हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा रस्ता रोको
शॉर्टसर्किटच्या आगीत पत्रकार प्रशांत मस्के यांचे संसाराचे स्वप्न राख; घरासह कपड्यांचे दुकान भस्मसात आगीत संसारोपयोगी साहित्य, व्यवसायाचे भांडवल जळून खाक; पत्रकार कुटुंबावर संकटाचा डोंगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!