विशाळगड प्रकरणी आक्षेपार्ह पोस्ट ठेवणे चौघांना भोवले.चौघांवर गुन्हे दाखल.
रोखठोक न्युज वार्ताहर
मुस्लिम समाजाच्या व हिंदू समाजाच्या भावना दुखावतील, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी केज पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज शहरातील मोंढा मार्केट जवळील रहिवासी बिलाल शेख व अजीजपुरा भागातील हकीम शेख या दोघांनी २२ जुलै रोजी रात्री ८ वाजता हिंदू समाजाच्या भावना दुखावतील, असा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला. तसेच 20 जुलै रोजी अनिकेत सरवदे रा.कुबेफळ व संजय लोंढे रा.केज यांनी इन्स्टाग्राम वर मुस्लिम समाजाच्यां भावना दुखावतील अशी पोस्ट केल्याची गोपिनीय माहीती मिळाली होती त्या वरुन ही कारवाई केज पोलीसांकडून झाली या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनात श्रीकांत चौधरी व पोलिस नाईक त्रिंबक रामराव सोपणे यांनी केज पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बिलाल शेख, हकीम शेख,अनिकेत सरवदे,संजय लोंढे चौघांविरुद्धु गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास केज पोलीस करत आहेत
