• Wed. Apr 29th, 2026

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपोषणाकडे कानाडोळा !एक महिन्याचा अवधी देऊन ही काम चालू केले नाही.निधी तर हडप करण्याचा डाव नाही ना,शंका उपस्थित?

Bybaba maske

Jul 25, 2024

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उपोषणाकडे कानाडोळा !

एक महिन्याचा अवधी देऊन ही काम चालू केले नाही.

निधी तर हडप करण्याचा डाव नाही ना,शंका उपस्थित?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील श्री संत नामदेव महाराज तीर्थक्षेत्र विकास कामाला सुरुवात करण्यात यावी म्हणून रोहन गलांडे पाटील यांचे अमरण उपोषन दोन दिवस झाले सुरू केले आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग केज उपोषणा कडे कानाडोळा करण्यात येत आहे का काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण दोन दिवसा पुर्वी ५० लाख निधीच्या विकास कामास सुरुवात केली आहे असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक महिन्या पुर्वीचे पत्र उपोषण करत्यास दिले असताना कार्यक्षेत्रात काहीच काम केलेले नाही तसेच रोहन गलांडे पाटील यांनी काल २४/०७/२०२४ रोजी अमरण उपोषन सुरू केले व आता सुध्दा सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काम सुरू केल्याचा देखावा करुन रोहन गलांडे पाटील यांचे अमरण उपोषन मोडीत काढून तीर्थक्षेत्र विकास कामाचा निधी हडपण्याचा डाव सार्वजनिक बांधकाम विभाचा आहे का असा प्रश्न रोहन गलांडे यांना पडला आहे कारण ५० लाख निधीच्या कामाला वीस तीस हजाराची अर्धवट सामग्री कार्यक्षेत्रात उपोषणाला सुरुवात केली दाखवायची व उपोषण बंद करून काम सुद्धा बंद करायचे या आगोदर रोहन गंलाडे हे उपोषणास बसले असता एक महिन्याचा अवधी देऊन खडी,वाळू कामाच्या ठिकाणी आणून टाकली व उपोषण सोडल्यानंतर कुठलेच काम केले नाही.त्यानंतर काल पासुन पुन्हा उपोषण चालु केले असता आता सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या उपोषणा कडे दुर्लक्ष केले जात आहे. यात गुत्तेदाराला हाताशी धरून पुर्ण निधीच हडप करायचा तर नाहीना असा प्रश्न आता चिंचोली येतील नागरिकात पडला आहे.कारण हे तीर्थक्षेत्र हे गावाच्या भावनेचा विषय आहे 

 तरी या कामाकडे दुर्लक्ष करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असुन जर असे होत राहनार असेल तर माझे पन अमरण सुरुच राहणार आहे जर उपोषणा दरम्यान मी मेलो तर प्रशासनान व सार्वजनिक बांधकाम विभाग केज व अंबाजोगाई बांधकाम विभाग जबाबदार राहणार आहे असे अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ तालुका अध्यक्ष रोहन गलांडे यांनी म्हटले आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!