मी विधानसभेची निवडणूक लढवणारच-माजी आमदार संगिता ठोंबरे.
संगिता ठोंबरे जंयत पाटील यांना भेटल्याने राष्ट्रवादीतील इच्छुकांची धाकधूक वाढली.
मी पाठपुरावा करून मंजूर करून आनलेल्या कामाचे श्रेय कोणीही घेवो जनतेला माहिती आहे काम कोणी केले
आम्ही मंजूर केलेली कामे पण अजुन पूर्ण होऊ शकली नाहित
रोखठोक न्युज वार्ताहर
माजी आ. संगीता ठोंबरे यांनी विद्यमान आ. नमिता मुदडा यांच्या निष्क्रियता बद्दल आभार व्यक्त केले व आम्ही आमच्या काळात जनहिताच्या मंजूर केलेल्या योजना पण या पाच वर्ष मध्ये पूर्ण होऊ शकले नाही हे दुर्देवी आहे. कदाचित आम्ही मंजूर केलेल्या कामाचे उद्घाटन आमच्याच हस्ते व्हावे असे नियतीच्या मनात असावे असे संगीता ठोंबरे यांनी केज येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या. माजी आमदार संगीता ठोंबरे या केज मतदार संघतून निवडणूक लढवण्यावर ठाम असून त्यांनी मतदारसंघात त्यांचा एक दौरा कंप्लिट झाला असून केज मतदार संघातील नागरिकांनी त्यांना भरघोस असा प्रतिसाद देत आहे विद्यमान आमदारावर प्रचंड नाराज असणारी जनता व जनता आमदारांच्या हस्तक्षेपामुळे त्रस्त झाले असल्यामुळे समोर कोण येणार याची वाट पाहत होता आणि माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या माध्यमातून एक चांगला आमदार पुन्हा पाहायला मिळेल अशी लोकांना अपेक्षा आहे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी अगदी ठामपणे मी उभारणारच असे सांगितले आहे सध्या तरी भारतीय जनता पक्ष यांच्याकडेच उमेदवारी मागितली आहे परंतु समोर येणाऱ्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल परंतु २०२४ ची निवडणूक ही माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी निवडणूक लढणारच आहे यावर त्या ठाम आहेत असे दिसून येते या पत्रकार परिषदेत बोलताना संगीता ठोंबरे म्हणाले की माझ्या पाच वर्षाच्या कालावधीत जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली त्यासाठी मी जनतेची ऋणी आहे व मी काम करण्याची पूर्ण क्षमतेने प्रयत्न केला आहे ते शहरात उभारणारे लोकनेते गोपीनाथ मुंडे सभागृह तसेच औद्योगिक क्षेत्रात लोकनेते गोपीनाथ मुंडे सहकारी सूतगिरणी उभारण्यासाठी प्रयत्न केले. सूतगिरणी लवकरच सुरू होईल हे शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे नाट्यगृह उभारण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब चंद्रकांत दादा पाटील साहेब पंकजाताई मुंडे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील पहिल्यांदाच ही जागा हस्तांतरित झाली त्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले परंतु ही जागा हस्तांतरित झाली मी केलेल्या प्रयत्नांना कदाचित नियती म्हणून पुन्हा मी आमदार झाल्यावरच त्याचे काम सुरू होईल असे वाटते तसेच उमरी येवता येतील गायरान जमिनीवर औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले आहेत ज्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होण्याची संधी मिळेल त्यासाठी लागणाऱ्या पूर्ण तयारी झाली होती फक्त पाण्याची एक समस्या राहिली होती त्यासाठी कृष्णा खोरेतून तीन पीएमसी पाणी मिळवण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न केला होता कदाचित हेही काम मी आमदार झाल्यानंतर पूर्ण होईल अशी नियती असावी.
केज मतदार संघात कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्यासाठी मी माझ्या काळात पूर्ण प्रयत्न केलेले आहेत धनेगाव धरणाखाली पर्यटन विभागाकडून एक छानशी बाग बोटिंग वगैरे करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत तेही काम कदाचित माझ्याच हाती होईल असे सांगताना विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर चांगलाच आसूड ओढला तसेच माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी सांगितले की माझ्या आमदारकीच्या काळात नेकनूर येथील बस स्टॅन्ड तसेच पाच सब स्टेशन चे काम मी करण्याच्या प्रयत्न केला होता सब स्टेशनचे काम पूर्ण झाले पूर्ण होत आले आता कदाचित मी नव्याने आमदार झाल्यावर त्याचे उद्घाटन होईल त्यामुळे मागील पाच वर्षांपूर्वी मी ज्या ज्या कामासाठी प्रयत्न केले ती कामे अद्यापही तसेच अवस्थेत आहेत विद्यमान आमदारांनी त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत व ते काम मी माझ्याच पुढील कार्यकाळात पूर्ण व्हावी अशी नियत असावी असे पत्रकारांशी बोलताना माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी सांगितले तसेच जनतेला कधीही डीपी दवाखाना या कामासाठी वाट पाहावी लागत नव्हते हे जनसेवेची कामे करून घेण्यासाठी अधिकारी असतात फक्त अधिकाऱ्यांनी काम करावे या सूचना देण्याचे काम मी केले होते व माझ्या काळात महिना महिना दोन दोन महिने डीपी मिळाली नाही असे कधीही झाले नाही तसेच दवाखान्यात उपचार घेण्यासाठी कोणाच्याही शिफारशीची गरज कधी लागली नाही असे बोलून विद्यमान आमदारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आता मी २०२४ ची निवडून निवडणूक लढवणार असल्याचे ठामपणे सांगून भारतीय जनता पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेली आहे जर त्यांनी मला उमेदवारी नाकारली तर बाकीच्या पर्यंत नक्कीच विचार केला जाईल परंतु निवडणूक मी लढवणारच यावर माजी आमदार संगीता ठोंबरे ठाम आहेत
केज विधानसभा मतदार संघातील भाजपच्या नेत्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज शरदचंद्र पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्याची माहिती मिळत असून, गेल्या तीन-चार वर्षापासून संगीता ठोंबरे या भाजप व राजकारणापासून अलिप्त होत्या. त्या भारतीय जनता पार्टीत नाराज असल्याचे बोललेजात होते. गेल्या आठवड्यामध्ये भाजपचे नेते पंकजा मुंडे यांची विधान परिषद निवड होऊन शपथविधी घेतल्यानंतर अचानकसंगीता ठोंबरे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केज मतदार संघामध्ये संगीता ठोंबरे ह्या 2024 विधानसभेसाठी निवडणूक मिळवण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. आज अचानक संगीता ठोंबरे या शरद पवार यांची भेट घेण्यासाठी गेल्याने राजकारणात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार का? हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
