केज विधानसभेच्या रिंगणात खिचडी.
कोण कुठ पळतोय काही कळेना,जनता सर्कस पाहण्यात मश्गुल.
रोखठोक न्युज वार्ताहर
विधानसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी उमेदवारांची संगीत खुर्ची चालू झाली आहे.केज मतरसंघ हा गेली 46 वर्ष झाला अनुसूचित जातीला राखीव आहे,त्यामुळे मातब्बर,प्रस्थापित पुढाऱ्यांची गच्छंती झाली होती.या वेळेस ही राखीव मतदारसंघातून होणारी निवडणूक ही शेवटची असल्याच बोलल जात आहे कारण मतरसंघातील आरक्षण उठणार आहे त्यामुळेच या मतरसंघात उमेदवारांची गर्दी झाल्याचे बघण्यात येत आहे.यात सद्या तरी भाजपचे नमिताताई मुंदडा ह्या आमदार असून त्याच पुन्हा एकदा भाजप कडून निवडणूक लढवतील असे चित्र निर्माण झाले आहे.पण त्यांना पालकमंत्री धनंजय मुंडे कितपत मदत करतात हे त्यांच्यावर अवलंबून आहे.तसेच आमदार नमिताताई मुंदडा यांच्या बद्दल मतरसंघात प्रचंड नाराजी असल्या कारणाने व केज मतरसंघातून लोकसभेला भाजप उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मताची लिड आमदार नमिताताई देऊ शकल्या नाहीत. त्यामुळेच इतर उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत त्यामुळेच विधानसभे साठी उमेदवारांची एकच गर्दी झाल्याची पाहिल्या मिळत आहे.या उमेदवारा मध्ये माजी आमदार संगिताताई ठोंबरे.माजी आमदार पृथ्वीराज साठे एक वेळेस विधानसभा लढवलेल्या अंजलीताई घाडगे,प्रसिद्ध उद्योजक विजय व्हावळ,डॉक्टर राहून शिंदे, डाॅ नयना सिरसट,रमेश तात्या गालफाडे,इंजिनीअर शिंदे असी वाढत जाणारी यादी आहे यात अजून किती नावे येतात ते जशी विधानसभा जवळ येईल तशी कळत राहील यात आमदार नमिताताई मुंदडा सोडल्या तर सर्व जण राष्ट्रवादीकडून(शरद पवार) गटाकडून इच्छुक आहेत यात कोण बाजी मारतय तो येणारा काळच ठरवेल पण केज विधानसभेत मतदाराला आता बद्दल पाहीजे हे एकंदरीत मतदारांच्या बोलण्यातून कळत आहे.आमदार नमिताताई मुदंडा यांचे कागदावरचे काम प्रत्यक्षात गावात दिसून येत नसल्याच्या तक्रारी आता वाढल्या आहेत.वंजारी,मराठा,मुस्लिम समाजातील दोन चार कार्यकर्ते हाताशी धरायचे म्हणजे सगळा समाज बरोबर आसतो हे मुंदडा कुटुंबाला कधी समजलच नाही.स्वतः मागासवर्गीय म्हणून निवडणूक लढवतात पण यांना दलिताची अलर्जी आहे यांच्या जवळपास एक ही दलित कार्यकर्ता नाही.
दोन चार कार्यकर्त्यांना काम द्याचे व बाकी समाज उपाशीच ही मुंदडा कुटुंबाची राजकीय खेळी असते.समाजात जनाधार नसलेले नेते म्हणावरे त्यांच्या बैलगाडीचे सारथ्य करत असतात.त्याना वाटत असत ही बैलगाडी मीच चालवतोय पण लोकसभेतच यांचा फुगा फुटला आहे.गुत्तेदार व प्लॉटींग व्यावसायिक यांचे कार्यकर्ते आहेत.
आता लोक पुढे होऊन त्यावर बोलत आहेत.आमदार व त्यांचे कुटुंबीय काही मर्यादित कार्यकर्त्या च्यात गुरफटलेले दिसून आले.ते कधी जनते पंर्यत या कार्यकर्त्यांने पोहचू दिले नाही व आमदारांनी तसे प्रयत्न गेल्या पाच वर्षांत दिसून आले नाहीत.
एकूण सगळे वातावरण बघून नविन उमेदवार येथे बाजी मारू शकतो त्याच मुळे उमेदवारांची बाहूगर्दी वाढली आहे.सद्या तरी शरद पवार(राष्ट्रवादी काँग्रेस) गटाचा उमेदवार निवडून येऊ शकतो असे मतदारसंघात वातावरण आहे.
