• Sat. Sep 19th, 2026

अज्ञात वाहनाने दुचाकी ला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी वरील पती – पत्नी गंभीर जखमी

Bybaba maske

Aug 5, 2024

अज्ञात वाहनाने दुचाकी ला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी वरील पती – पत्नी गंभीर जखमी

रोखठोक न्युज वार्ताहर 

धारूर रोडवरील नेहरकर पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनाने दुचाकी ला दिलेल्या धडकेमध्ये दुचाकी वरील पती – पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडली.

धारूर तालुक्यातील आवरगाव येथील घनश्याम ऋतू पद्म शिंदे वय 40 हे आणि त्यांच्या पत्नी हे केज कडून धारूर कडे रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान निघाले होते.

दरम्यान भवानी मंदिराच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर एका पेट्रोल पंपाच्या समोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये घनश्याम शिंदे यांच्या पायाला, डोक्याला गंभीर इजा झाली असून त्यांच्या पत्नीही जखमी झाल्या आहेत. सदरील अपघाताची माहिती मिळताच 108 ची रुग्णवाहिका त्या ठिकाणी तात्काळ पोहोचली आणि जखमींना उपचारार्थ हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर लातूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!