• Sat. Sep 19th, 2026

बोरीच्या झाडाची संगत आमदाराला तारणार का बुडवणार. सत्तेला चिटकलेले काही भामटे,आमदाराची नाव बुडवणार.

Bybaba maske

Aug 7, 2024

बोरीच्या झाडाची संगत आमदाराला तारणार का बुडवणार.

सत्तेला चिटकलेले काही भामटे,आमदाराची नाव बुडवणार.

रोखठोक न्युज विशेष 

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 26 नोव्हेंबर रोजी संपत आहे,त्यामुळे विधानसभेच्या निवडणूका दिवाळीच्या आगोदर किंवा त्यानंतर लागतील अशी शक्यता आहे.

सद्या केज विधानसभे साठी उमेदवाराचे पेव सुटले आहे जो तो उमेदवार फेसबुक, वर्तमानपत्रात झळकू लागला आहे.विधानसभेच्या निवडणूकी अधी राजकीय नेत्याची अवस्था विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी झाली आहे.केज विधानसभेची निवडणूक ही भाजपच्या कमळा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुतारी अशीच होईल आता हे सर्वश्रुत झाले आहे.निवडणूक आयोगाने राज्यांना 20 ऑगस्टपर्यंत मतदार यादी अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. मतदार यादी अपडेट केल्यानंतर निवडणूक आयोग चार राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर कधीही जाहीर करण्याची शक्यता आहे. अशातच केज-अंबाजोगाई तालुक्यात मोठे राजकीय रणकंदन होणार हे उघड आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते तयारीला लागले आहे. त्यांनी शहर आणि तालुक्यातील सर्वच संघटना आणि त्यांचे जातीनिहाय नेते आणि त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्यासाठी हात मोकळा सोडला आहे. त्यातच भरीला मोठे वाढदिवस, लग्न,मुजं सह विविध नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू सामाजिक सेवेचे अवसान आणण्यास पुढाकार घेतला असल्याचे दिसत आहे

लोकसभेत सत्ताधारी भाजपला नाकारल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून सगळेच उमेदवार तुतारी हातात घेण्या साठी गायीच्या नवट वासरा सारखे शेपूट वर करून मोठा दणका मारून थेट तुतारीच्या नेत्यांना गाठत आहेत.तुतारी वाले सद्या आलेल्या इच्छुक उमेदवाराला कोपराला गुळ लावून झुलवत ठेवत आहेत आणि सक्षम उमेदवाराचा शोध घेत आहेत.

तर इकड सत्ताधारी शहराना महानगर केल्याच भासवत आहेत.रोज एक मंजुरीच किंवा मतदारसंघाती कामा बाबतीतली पत्र सोशल मीडियावर पडत आहे.कोटींच्या कोटी उडाने होत आहे.होत असलेल्या कामाचे फोटो पढत आहेत.पण होणारे कामे किती दिवस टिकतील याची गॅरंटी घेणारे पत्र कुठेच पडताना किंवा वर्तमानपत्रातून सांगताना दिसत नाही.10/20% घेऊन केलेले विकास कामे किती दिवस टिकणार आहेत.

केज मतरसंघात सत्ताधारी गटातील आमदाराच्या कार्यकर्त्यां ठेका देताना सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांना 05 तर शहर आणि तालुक्यातील अन्य ठेकेदार आदींना 10 टक्के (निवडणूक) पक्ष निधी म्हणून विशेष टोल आकारला जात आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते आहे त्या ठिकाणी पेव्हर लॉक बसवायचा भीम पराक्रम शहरातील अधिकारी आणि नेते करताना दिसत आहे. हे कमी की काय निवडणुकीत पैशाची कमतरता नको म्हणून जी कामे केली नाही त्यांची बिले काढण्याचे मागील पंचवार्षिक काळात झालेले पराक्रम या काळात नोंदवले नव्हे मोडले जात आहे. मागील माजी लोकप्रतिनिधींचे सर्व रेकॉर्ड तोडून मोडून फेकले जात आहे. टक्केवारी वरून नाराज असलेले काही कार्यकर्ते तरीही काही (अ) सामाजिक तत्वांना कोट्यवधीचा निधी देऊनही त्यांनी आपला; हिसका सत्ताधाऱ्यांना दाखवला आहेच. व “आगे आगे देखो होता है क्या ? अशी खास चुणूक त्यांनी दाखवून दिली आहे.त्यामुळे त्यांच्या मतांसाठी व्याकूळ असलेल्या सत्ताधारी नेत्यांची अवस्था ही थोड्या पाण्यातील मासुळ्या सारखी व्याकूळ झाली आहे असो !

आमदाराच्या जवळच्या काही कार्यकर्त्या मुळे 

बोरीचे झाडाचे जवळ गेले असता वस्त्र अडकवून गुंतविते ते वस्त्र ओढून काढू लागल्यास अंगास काटे ओरखडतात,फळे खावू जाता घसा पोळून निघतो

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!