स्कूल बस व मोटारसायकल च्या अपघातात एक गंभीर जखमी.
एका राजकीय नेत्याच्या शाळीची स्कूल बस.
रोखठोक न्युज वार्ताहर
केज उपजिल्हा रुग्णालया जवळ स्कूल बसने मोटारसायकल वर असलेल्या बाळासाहेब महादेव पाटोळे वय 40 रा.लाडेगाव यांना समोरासमोर धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.बाळासाहेब पाटोळे हे आपल्या गावी लाडेगाव ता.केज येथे मोटारसायकल क्रमांक MH 44 N 6327 या नंबरच्या गाडीवर जात असताना स्कूल बस MH 44 S 1844 ही समोरून राँग साईडने येऊन मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने मोटारसायकल स्वार बाळासाहेब पाटोळे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपजिल्हा रुग्णालय केज येथे दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात पुढील उपचारार्थ पाठवले आहे.बाळासाहेब पाटोळे यांच्या दोन्ही मनगटाचे हाड तुटल्याचे त्यांच्या नातेवाईकाांनी रोखठोक न्युज शी बोलताना सांगीतल.
- ही स्कूल बस एका प्रतिष्ठित शहरातील राजकीय नेत्याची असल्याचे बोलले जात आहे.पोलीसांकडून अजून पंर्यत स्कूल बस वर कुठलीच कारवाई केली नसल्याच बोलल जात आहे.
