• Sat. Sep 19th, 2026

लाच घेताना महावितरणची महिला कर्मचारी जाळ्यात. बीडच्या सरकारी कर्मचारी लाचलुचपत घेण्यात अव्वल ठरत आहेत. 

Bybaba maske

Sep 6, 2024

लाच घेताना महावितरणची महिला कर्मचारी जाळ्यात.

बीडच्या सरकारी कर्मचारी लाचलुचपत घेण्यात अव्वल ठरत आहेत. 

रोखठोक न्युज वार्ताहर 

वीज चोरी पकडल्यानंतर तो प्रकरण बाहेर न येऊ देण्यासाठी महावितरणच्या महिला कर्मचाऱ्याने १६ हजारांची लाच मागितली होती. ते लाचेचे १६ हजार रुपये घेताना दोघांना बीड लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आहे. यामुळे जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी अवल्ल ठरत असल्याने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला उसंत घेण्या साठी वेळ नाही ऐवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत आहेत एवढे लाचखोरी बीड जिल्ह्य़ात कशी असा प्रश्न वाढत्या लाचखोरांच्या कारवाईमुळे उपस्थित केला जात आहे.

महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहायक असलेली पुनम लहू आमटे असे लाचखोर महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. धानोरा रोड येथे एका विद्युत ग्राहाकाची वीज चोरी पकडली होती. तो प्रकार उघडकीस न आणता मिटवून घेण्यासाठी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती १६ हजार रुपये घेण्याचे मान्य केले. परंतु तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचेचा सापळा लावला होता. यावेळी लाच स्वीकारताना पुनम आमटे आणि अन्य एक जण असे दोघे चतुर्भूज झाले आहेत. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. बीड जिल्ह्यातील वाढत्या लाचखोरीच्या कारवायांमुळे बीड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला निवांत राहूच द्यायचं नाही अशी शपथ घेतली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

baba maske

Related Post

फोनपे-गुगलपेच्या युगात केज नगरपंचायत अजूनही ‘कॅश’वरच! सत्ताधारी ‘४०-४०-२०’च्या चर्चेत गुंग? मग किमान मुख्याधिकारी अजित ढोपे हे नेमके काय काम करतात? चहाच्या टपरीवाल्यापासून भाजीवाल्यापर्यंत डिजिटल व्यवहार; मग नगरपंचायतीला कॅशलेस होण्याची प्रतीक्षा कशासाठी?
अधिष्ठाता शंकर धपाटे एवढे अनभिज्ञ कसे? कंत्राटी भरतीवर हात झटकता येणार नाही! वर्ग ३ व वर्ग ४च्या जागा भरल्या; स्मार्ट कंपनीचे कार्यालय अंबाजोगाईत नाही, मग मुलाखती कुठे झाल्या? अधिष्ठात्यांची गोलगोल भूमिका प्रश्न अधिक चिघळवणारी; ‘शिफारशींवर भरती की गुणवत्तेवर?’ जनतेचा सवाल
स्लॅब भराई दरम्यान विजेचा शाॅक लागून दोघाचा मृत्यू!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!