माऊली बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान नाव्होली यांच्याकडुन शेतकऱ्यांच्या पीक नुकसान भरपाई साठी खंडपीठात पुन्हा जनहित याचिका दाखल,
राज्य शासनासह विविध विभागांना नोटीस बजावण्याचे न्यायालयाचे आदेश.
रोखठोक न्युज वार्ताहर
महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल जनहित याचिके च्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या.मंगेश पाटील आणि न्या.एस.पी.ब्रम्हे यांनी राज्यशासना सह,महसूल आणि वन विभागाचे मुख्य सचिव कृषीविभागाचे प्रधान सचिव,छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त आणि बीड जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला.केज तालुक्यातील माऊली बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान यांनी अॕड.शेख तारेक मोबीन यांच्या मार्फत दाखल केलेल्या दुसऱ्या जनहित याचिकेत म्हटल्या प्रमाणे २०१९-२० साली राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य शासनाने दि.२९ ऑगस्ट २०१९ रोजी शासननिर्णय जाहीर केला होता.मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही.म्हणून जनहित याचिका क्र.१३२/२०९ दाखल करण्यात आली होती.सुनावणी दरम्यान शासन निर्णयाची अंमल बजावणी करीत असल्या बाबतचे निवेदन सरकारी वकील केले होते.त्यामुळे खंडपीठाने ती जनहित याचिका निकाली काढली होती.२०१९ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नसताना,राज्य शासनाने दि.९ नोव्हेंबर २०२० रोजी दुसरा शासन निर्णय जाहीर करून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे घोषित केले.त्यावरून बीड जिल्ह्यातील नाव्होली येथील माऊली बळीराजा सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांनी आणियाचिका कर्त्यान्यासाने शेतकऱ्यांना पिक नुकसान भरपाई मिळावी,यासाठी उपोषणाचा, आत्मदहनाचा इशारा दिला होता.याचिकाकर्त्या नी दि.१ डिसेंबर २०२१ रोजी प्रतिवाद्यांना निवेदन देऊन दि.२९ ऑगस्ट २०१९ च्या शासन निर्णयानुसार तसेच जनहित याचिका क्रमांक १३२/१९ च्या अनुषंगाने खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती केली होती.नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे दुसरी जनहित याचिका दाखल केली आहे. शासनाने न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याने शेतकरी पिक नुकसान भरपाई पासुन वंचीत राहीलेले आहेत.अशा दुतोंडी सरकारला शेतकरी जागा दाखविणारअसल्याचा ईशारा माऊली बळीराजा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सी.बी.एस. ईनामदार,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष विनोद चाटे पाटील,राष्ट्रवादी किसान आघाडी सेलचे केज तालुकाध्यक्ष प्रमोद जाधव,सामाजिक न्याय केज तालुकाध्यक्ष अक्षय मजमुले,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केज तालुका युवकअध्यक्ष कैलास चाळक यांनी पञकार परिषदेत दिला आहे.
