भाजपचा बालेकिल्ला ढासळला! बीड जिल्हाध्यक्षांचा राम राम.
कोणी उमेदवारी मागेना, इच्छुकांची संख्याही घटली.
ज्योती मेटेचां राशप मध्ये प्रवेश तर आमदार लक्ष्मण पवार, भिमराव धोंडे ,मोहन जगताप, रमेश आडसकर पळ काढताना दिसतायत?
केज मतरसंघात फक्त नमिता मुदंडा यांचीच मागणी व उमेदवारी त्यांनाच भेटली.
रोखठोक न्युज वार्ताहर
बीड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, तिकीट मिळाले की विजय निश्चित अशी ताकद होती, जिल्हाध्यक्षपद मिळवण्यासाठीसुद्धा शर्थीचे प्रयत्न कराके लागत होते. अशा एकेकाळी बलाढ्य असलेल्या भाजपला बीडमध्ये मोठी उतरती कळा लागली आहे. त्यामुळे भाजपकडून उमेदवारीसाठी कोणी प्रयत्न करेना, भाजपसाठी जागा सोडा म्हणून मागणी होईना. त्यामुळे विद्यमान आमदारानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी गंभीर आरोप करत पक्षाला राम राम ठोकला आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे राजेंद्र मस्के यांनी आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
समर्थकांसोबत झालेल्या बैठकीत पक्ष सोडण्याबाबत निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पदाचा सन्मान राखत पक्षासाठी मोठे परिश्रम घेतले. मात्र, भाजपची सत्ता आल्यानंतर पक्ष नेतृत्वाने कामाची दखल घेतली नाही. उलट दुजाभाव केला.विरोधकांची मर्जी राखली. विरोधकांना बळ देण्याचे प्रयत्न झाले. सत्ता मिळूनही भाजपच्या निष्ठावंतांची गोची करण्याचे काम या अडीच वर्षांत झाले, असा आरोप त्यांनी करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
राजेंद्र मस्के हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत. लवकरच त्यांच्याकडे राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार आहे. एकीकडे राजेंद्र मस्के यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात असताना दुसरीकडे कधी काळचे सहकारी शिवसंग्राम चे दिवंगत विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेट यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे.तर केज मतरसंघात भाजप कडून नमिता मुंदडा या एकट्याच इच्छुक असल्याने त्यांना उमेदवारी मिळाली भाजपच्या जाहीर केलेल्या 99 जागेत त्यांचा पहिल्याच यादीत समावेश झाला मात्र त्यांच्या शिवाय कोणी इच्छुक नव्हते त्यामुळे केज मतरसंघात कोणी उमेदवारी मागितलीच नाही.तर दुसरी कडे
भाजपकडून निवडणूक लढवण्यास कोणी इच्छुक नाही. उमेदवारी मागत नाही. कुणी मतदारसंघ भाजपला सोडा अशी मागणी करत नाही. उलट भाजपचे गेवराईचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार, माजलगावचे मोहनराव जगताप, भाजपचे रमेश आडसकर, भीमराव धोंडे हेही भाजपपासून लांब पळत आहेत. एकेकाळी बीड जिह्यामध्ये भाजप पाच जागेवर निवडणूक लढवत असे. यंदा कशाबशा दोन जागा येत असल्याने भाजपचा बालेकिल्ला ढासळत असल्याची चर्चा होत आहे.
