केज शहरातील दलित-मुस्लिमाचा मसीहा म्हणून घेणारे,सर्वेसर्वा त्या वेळेस आपल्या % वारीच्या पैशात लोळत होते.
पावसाळ्यात अख्खी कुरेशी गल्लीत घराघरात पाणी घुसले होत,दलित वस्तीचा निधी अन्यत्र वळवला होता.
दलित नगराध्यक्ष सिता बनसोड घरात झोपा घेत होते?
रोखठोक न्युज वार्ताहर
केज नगरपंचायत चे स्वतःला सर्वेसर्वा म्हणून घेणारे,वार्ड क्रमांक सहा मधी दणक्यात आपटलेले(पराभव)झालेले हारून इनामदार पुन्हा मागच्या दाराने प्रवेश करून नगरसेवक झाले.पण सर्व कारभार सर्वेसर्वा म्हणून करणारे नगरपंचायत मार्फत आमदार नमिताताई मुंदडा यांनी नगरोत्थान योजनेंतर्गत 78 कोटीचा निधी मंजूर करून आणला त्या वेळेस लाळघोटत % साठी नाहरकत प्रमाणपत्र दिल जिथे अवश्यकता नव्हती तीथे रस्त्याच नियोजन केले त्याच नियोजनात कुरेशी गल्ली येथील खारी बावडी परीसरात पावसाळ्यात घराघरात पाणी घुसले त्या वेळेस कुठे गेले होते.
केज शहरातील आण्णाभाऊ साठे दलित वस्तीचा निधी अन्यत्र वळवला. जिथे दहा दलितांचे घरे नाहीत तिथे निधी घेऊन गेले ऐवढच नाही तर आपल्या अध्यक्षीय असलेल्या संस्थेच्या शाळेकडे निधी वळवला, शाळेच्या पुढे आपल्याच भाऊबंदकीची ईट भट्टी आहे तिकडे दलित वस्तीचे कामे केले त्या साठी समाजकल्याण विभागाला अंधारात ठेवून खोटे प्रतिज्ञापत्र तयार केले त्या साठी काही दिवसा पुर्वी माहिती अधिकार संघाचे जिल्हाध्यक्ष अजय भांगे,सुदेश सिरसट यांनी त्या साठी केज तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केले त्या वेळेस दलित नगराध्यक्ष घरात झोपा घेत होते काय?
ज्या वेळेस दलित निधी जर दलित वस्तीत भेटत नाही त्या वेळेस दलित नगराध्यक्ष कोणताच प्रतिकार करत नसेल तर याला जनता बाहुले आहे असे संभवते.
शहरातील अण्णाभाऊ साठे नगरात समाज मंदिरावर चक्क शौचालय सर्वेसर्वा हारून इनामदार व नगराध्यक्ष सिता बनसोड यांच्या कार्यकर्त्याने बांधले आहे पण आज तिन वर्षात साधे शौचालय पाडू शकले नाहीत अश्या या लबाड लोकान वर समाज विश्वास ठेवेल का आता दलित-मुस्लिम जनतेतून बोलले जात आहे.
