• Wed. Apr 29th, 2026

गडकरीच्या सभेने तुतारीची हवा निघाली. मला तुतारीने पाडले तुम्ही तुतारीला पाडा पंकजा मुंडे यांचे अहवान. 25 नोव्हेंबर पासून वैद्यनाथ साखर कारखाना चालू होणार, शेतकऱ्यांनी भिऊ नये.

Bybaba maske

Nov 13, 2024

गडकरीच्या सभेने तुतारीची हवा निघाली.

मला तुतारीने पाडले तुम्ही तुतारीला पाडा पंकजा मुंडे यांचे अहवान.

25 नोव्हेंबर पासून वैद्यनाथ साखर कारखाना चालू होणार, शेतकऱ्यांनी भिऊ नये.

रोखठोक न्युज वार्ताहर 

काल अंबाजोगाई रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जोरदार सभा झाली.गडकरी म्हणाले आम्ही विकासाच्या जोरावर राजकारण करतात. जात बघून विकास करत नाहीत माजी खासदार प्रितम मुंडे यांनी सांगितलेले बीड जिल्ह्य़ातील प्रत्येक काम करण्याचा प्रयत्न केला व त्या साठी भरघोस निधी दिला आता ही नमिता मुंदडा यांना विजयी करा बर्दापूर ते अंबाजोगाई रस्ता सहा महिन्यांत चार पदरी करतो असे अश्वासन त्यांनी भर सभेत दिले तुम्ही वादा पुर्ण करा मी माझा वादा पुर्ण करतो असे ते म्हणाले.

त्या नंतर आमदार पंकजा मुंडे यांनी घणघणीत भाषण केले ज्या लोकसभेला तुतारी ने माझा पराभव केला त्या तुतारीचा तुम्ही पराभव करा आणि आमदार नमिता मुदंडा यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवा.

त्यानंतर उसाच्या राजकारणा वर बोलताना सांगितले की तुम्हाला आता ऊसा साठी घाबरण्याची गरज नाही येत्या 25 नोव्हेंबरपासून वैद्यनाथ साखर कारखाना चालू होतोय सगळे विघ्न टळले आहेत आता शेतकर्‍यानी घाबरायची गरज नाही.पुन्हा एकदा केज मतरसंघात कमळ फुलवा असे अहवान त्यांनी सभेतून केले.सभेला मोठ्या प्रमाणावर नागरिक आले होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!