• Sun. Nov 1st, 2026

बिबट्याचा धुमाकूळ :अंबाजोगाई तालुक्यातील  माकेगाव शिवारात बैलाचा पाडला फडशा,

Bybaba maske

Nov 29, 2024

बिबट्याचा धुमाकूळ :अंबाजोगाई तालुक्यातील  माकेगाव शिवारात बैलाचा पाडला फडशा,

रोखठोक न्युज वार्ताहर 

अंबाजोगाई तालुक्यातील‌ काही भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्याच्या वावराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पुस – जवळगाव, ममदापूर – पाटोदा या नंतर आता बिबट्याने माकेगाव परिसरात मोर्चा वळवला आहे. माकेगाव येथील शेतकरी रवि देशमुख यांच्या शेतातील बैलाचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या बाबत प्राप्त माहिती अशी की, पुस – जवळगाव परिसरात विवेक आटोळे यांच्या शेतात काल बिबट्याचा वावर दिसून आला. त्याने एका शेळीचा फडशा पाडला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. ही घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा ममदापूर – पाटोदा परिसरातील लेंडी शिवारात बिबट्या दिसून आला आहे. एका ग्रामस्थाने बिबट्याचा व्हिडिओ त्याच्या चारचाकी गाडीतून कैद केला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता बिबट्या माकेगाव शिवारात शिरला आहे. माकेगाव परिसरातील कॅनालच्या बाजूला असलेल्या पत्री पुलाजवळ बिबट्याने रवि देशमुख यांच्या बैलाचा फडशा पाडला आहे. त्यामुळे देशमुख यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या दिसताच वनविभागाला कल्पना द्यावी, असं आवाहन केले आहे. त्यासोबतच ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.

baba maske

Related Post

स्वतःच्या घरापासून सुरुवात! रस्ता रुंदीकरणासाठी नगराध्यक्ष काकाजी (नंदकिशोर मुंदडांनी) पाडली घराची संरक्षक भिंतनियम सांगण्यापेक्षा ते स्वतः पाळून दाखवले; अतिक्रमण हटाव मोहिमेतून शहराला दिला कृतीचा संदेश
आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा बीड पोलिसांकडून पर्दाफाश; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत! नेकनूर, केज, दिंद्रुड परिसरातील घरफोडी व वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस
केज नगरपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर! मुख्य बाजारपेठेत सांडपाण्याचे साम्राज्य; व्यापारी, नागरिक त्रस्त नवरात्रापूर्वी पाडलेला चौक अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; खड्डे, दुर्गंधी आणि अपघातांनी नागरिक हैराण, बाजारपेठ बंद ठेवून आंदोलनाचा इशारा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!