स्वतः ला वकील म्हणविणाऱ्या एकाने तहसील कार्यालयात घातला गोंधळ !
उपजिल्हाधिकारी आणि नायब तहसीलदार यांच्याशी उद्धट वर्तन करीत त्यांना धमकावले तर अनेक कर्मचाऱ्यांशी देखील गैरवर्तन
रोखठोक न्युज
गौतम बचुटे/केज:- मला विभागीय आयुक्त थर थर कापतात. तहसीलदार गिड्डे यांना सेवेतून निलंबित करा. तुम्ही निवडणुकीत खूप मोठा घोटाळा केलाय. मी तुम्हाला काम करू देणार नाही. तुम्ही पत्रकारांना तात्काळ बोलवा व याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करा. असे जोरजोराने ओरडुन म्हणून तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात आरडाओरड करून गोंधळ घालून उपजिल्हाधिकारी, नायब तहसीलदार यांच्याशी उद्धट वर्तन करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला. यामुळे तहसीलच्या कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:०० वा. च्या सुमारास उपजिल्हाधिकारी दिपक वजाळे हे केज येथील तहसील कार्यालयातील त्यांच्या दालनात बसून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे काम करीत होते. त्यावेळी अचानक शार्दुल देशपांडे नावाचा व्यक्ती आस्थापना विभागात आला. त्याने शुभम राऊत तुमचा कार्यालयाचा दलाल आहे का? तो ओळखपत्र घालत नाही. तुम्ही सर्व ओळखपत्र न घालनारे अधिकारी व कर्मचारी हे दलाल आहेत. असे बोलुन कार्यालयात गोंधळ घातला.
तेथे असलेल्या नायब तहसीलदार श्रीमती आशा वाघ या तेथे हजर होत्या.
त्या नंतर त्याने उपविभागीय अधिकारी दीपक वजाळे, केज नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी सचिन देशपांडे, महसुलविभागाचे नायब तहसिलदार भंडारे हे विधानसभा सार्वत्रीक निवडणुक २०२४ चे इंडेक्स कार्ड परिशिष्ट-४४ चे कामकाज करत असलेल्या ठिकाणी त्यांचे ऑफीस कार्यालयामध्ये शार्दुल देशपांडे अचानक घुसला. त्याने काही न विचारता समोर येवुन खुर्चीवर बसला आणि म्हणाला “तुम्ही दिपक वजाळेच ना?” असे म्हणाला. त्यावर उपविभागीय अधिकारी त्याला म्हणाले की, “हो, बोला. आपले काय काम आहे?” असे विचारले. त्यावर तो म्हणाला, की तो ॲड. शार्दुल देशपांडे असून तहसील कार्यालयातील सहाय्यक शुभम राऊत हा कर्मचारी आहे का ? तो ओळखपत्र घालत नाही. तुम्हाला तर माहित आहे की, शासन निर्णया प्रमाणे सर्व कर्मचारी यांनी ओळखपत्र घालणे बंधनकारक आहे. उपजिल्हाधिकारी यांना उद्देशून असे म्हणाला की, “तुम्ही आहेत तर तुम्हाला सांगतो; या कार्यालयात ओळखपत्र न घाणारे शासकीय कर्मचारी नसुन ते सर्जजण दलाल आहेत. त्यांना कोणालाही तो काम करु देणार नाही. त्यांना तात्काळ बाहेर काढा. तसेच निवडणुक संपल्यावर जो गोंधळ घातला. त्याचे सर्व व्हिडीओ त्याच्याकडे आहेत.
तसेच तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे मॅडम, मंजुशा मिसकर यांना सुध्दा तक्रारी केल्या आहेत. विभागीय आयुक्त गावडे हे सुध्दा ओळखपत्र घालीत नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करून तो म्हणाला की, ते सुध्दा लोकसेवक आहेत. मालक नाही. असे म्हणून तुम्ही व्यवस्थीत काम करा. नाही तर तुम्हालाही या कार्यालयात बसुन अजिबात काम करता येणार नाही आणि तुम्हाला काम करु देणार नाही. असे म्हणुन शार्दुल देशपांडे यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या टेबलवर असलेली सरकारी कामकाजाची फाईल उचलली व मोठमोठ्याने आरडा ओरडा सुरु केली.
त्या नंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि शहादेव मेहेत्रे यांनी हजर होवून शार्दुल यास ताब्यात घेतले.
या प्रकरणी शुभम राऊत यांच्या तक्रारी वरून शार्दुल देशपांडे यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरूपाचा गु र नं ११६२/२०२४ भा. न्या. सं. १२१ व १२४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
——————————————–
