नवनिर्वाचित आमदार यांनी देवेंद्र फडणवीस,अजित पवार, पंकजा मुंडे यांना भेटून शुभेच्छा.
तर केज मतरसंघात मंत्रीपद मिळेल याची चर्चा व मागणी
रोखठोक न्युज वार्ताहर
केज विधानसभा मतदारसंघातून आमदार नमिता यांनी दुसऱ्यांदा यश प्राप्त केल्यानंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. केज विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून होते या या निवडणुकीत नमिता मुंदडा यांनी मा. आ. पृथ्वीराज साठे यांचा 2681 मतांनी पराभव करत यश संपादन केले. 2 डिसेंबरला महायुती चे नवीन सरकार स्थापन होत आहे त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबईमध्ये काल भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर सदिच्छा भेट घेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने १३२ जागा जिंकत भाजपा हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनला आहे. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले. यावेळी देवेंद्र फडणीस यांनी नवनिर्वाचित आमदार नमिताताई मुंदडा यांचे सत्कार करून स्वागत केले. त्यानंतर ज्येष्ठ नेत्या आ. पंकजाताई मुंडे यांची वरळी येथे भेट घेत त्यांच्या सत्कार केला, महायुती चे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची देवगिरी बंगल्यावर सदिच्छा भेट घेत यावेळी नमिता मुंदडा यांनी केज मतदारसंघातील मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे, भाजप नेते
देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे यांच्या भक्कम पाठबळामुळे आणि कार्यकर्त्यांच्या अविरत परिश्रमामुळे यश संपादन करता आल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत अक्षय भैय्या मुंदडा सह इतर उपस्थित होते. पण केज मतरसंघात एक राखीव मतदारसंघातील आमदार व सलग दुसर्यानदा आमदार झाल्याने मंत्रीपद भेटेल अशी चर्चा व मागणी होत आहे.
