• Wed. Jun 24th, 2026

खासदार बप्पा,मा.आमदार संगिताताई, राजकिशोर मोदी,हारून इनामदार, सिता बनसोड ऐकीकडे, तरी पण मी एकटी बास्स म्हणत नमिता मुंदडा यांनी विजय खेचून आणला. केज,अंबाजोगाई मतदारसंघातील केलेल्या विकासावर लागली लाॅटरी.

Bybaba maske

Nov 24, 2024

खासदार बप्पा,मा.आमदार संगिताताई, राजकिशोर मोदी,हारून इनामदार, सिता बनसोड ऐकीकडे, तरी पण मी एकटी बास्स म्हणत नमिता मुंदडा यांनी विजय खेचून आणला.

केज,अंबाजोगाई मतदारसंघातील केलेल्या विकासावर लागली लाॅटरी.

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज मतरसंघात झालेल्या विकास कामाच्या जोरावर अखेर आमदार नमिताताई मुंदडा यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पृथ्वीराज साठे यांच्या वर 3500 च्या मताने मात देऊन विजयी झाल्या. लोकसभेच्या बंजरग सोनवणे यांच्या विजयानंतर विधानसभेची निवडणूक लागली त्यात राष्ट्रवादीकडून केज मतरसंघातून निवडून आलेले उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या मुळे कार्यकर्त्याचा आत्मविश्वास खुप वाढलेला होता. त्यातच विधानसभेची निवडणूक लागली आणि निवडणुकीच्या आधी वाढलेली इच्छुकांची गर्दी व अपक्षाची गर्दी यात अनपेक्षित सर्वाना राष्ट्रवादीकडून बळ देण्यात आले होते तुम्हीच उमेदवार म्हणून त्यांना जनतेसमोर जाण्यास सांगण्यात आले.पण ज्या वेळेस उमेदवारी दिली, त्या वेळेस निष्ठावंत असलेल्या पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी मिळाली.लोकसभेत महायुतीची झालेली पिछेहाट बघून महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला होता.त्यातच केज मतरसंघात बंजरग सोनवणे यांना 13000 हजाराची लिड भेटल्याने. अनेक इच्छुकांच्या राशप कडे उमेदवारी साठी रीग लागली होती 

त्या मुळेच पृथ्वीराज साठे विरोधातील उमेदवार म्हणून अंजली घाडगे,संगिता ठोंबरे,सिता बनसोड,विजय व्हावळ यांची विधान सभा लढवण्या साठी जोरदार तयारी केली होती यातील काहीीजणांना उमेदवारी देण्याचे आश्वासन पण देण्यात आले होते 

पण ऐन वेळेस  अश्वासन देऊन उमेदवारी माघे घेण्यास लावली व अश्वासनाची खैरात वाटली पण अश्यात ही भाजप कडून शेवटपर्यंत एकच उमेदवार होता तो म्हणजे नमिता मुंदडा.

सगळे पक्ष,अपक्ष विरोधात असताना आमदार पंकजा मुंडे,नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, नमिताताई मुंदडा, यांनी एक एक कार्यकर्त्याला काम देऊन बूथ मजबूत केले.महाविकास आघाडी ज्या जोरात धावत होती त्याला शांत राहून ब्रेक लावण्याचे काम केले अंबाजोगाई येथे विकास रत्न नितीन गडकरी यांची सभा घेतली शेवटच्या टप्प्यात जेथे सर्वात जास्त लोक ऊस तोडण्यास जातात व भाजपचा एक गठ्ठा मतदार आहे अश्या वंजारी समाजाच्या पट्यात सर्वात मोठी पंकजाताई मुंडे यांची सभा घेतली व मतदान तेथेच फिरले.

केज शहरात 100 कोटीचे कामे आमदार नमिताताई मुंदडा यांनी केले नगरपंचायत च्या सत्ताधाऱ्यांनी गुत्तेदाराकडुन % घेऊन नाहरकत प्रमाणपत्र दिले गेले त्या % वारीतून भेटलेल्या पैश्यावर विधानसभा लढवण्याची तयारी काही जणांन केली होती.

  1. पण केजच्या गल्लोगल्ली चे रस्ते सिमेंट काँक्रिट चे झाले हा विकास शहरातील लोकाना दिसत होते. खेडोपाड्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत झालेले रस्ते जनता बघत होती विकास होत होता तो फक्त मुंदडा नावा वर आणि शेवटी कामाच्या बळावर  विकासा वर  त्यांनी विजय खेचून आणला तो पण सगळे विरोधात असताना शेवटी नमिताताई म्हणल्या मी एकटी बास्स.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!