केज तालुक्यात मटक्याचा सुळसुळाट, लाखो परिवार उद्वस्त होण्याच्या मार्गावर.
पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
रोखठोक न्युज वार्ताहर
केज तालुक्यात मटका नावाच्या जुगाराचा सुळसुळाट झाला आहे.शहरातच नव्हे तर हे लोन गावा गावात, खेड्यात, वस्तीवर पोहचले आहे.सकाळी 10 वाजल्या पासुन रात्री 8 वाजेपर्यंत लोक मटक्याच्या बुक्यावर मटका खेळत उभे असतात.या अकड्याच्या गोळाबेरीजेत कितीक जनाचे संसार उद्ध्वस्त होत आहेत तर मटका बुक्की चालवणारा करोडो रूपय कमावत आहेत.या गोरगरिबांच्या संसाराची होळी होत असताना,पोलीस मुकदर्शक झाले आहेत यात भरपूर प्रमाणात अर्थपूर्ण घडामोडी घडत असल्या शिवाय पोलीस या कडे दुर्लक्ष करू शकत नाहीत असे जनतेत चर्चा आहे.
पोलीस उपधिक्षक पंकज कुमावत असताना कसलाच मटका चालत नव्हता,पंकज कुमावत यांच नाव जरी आले तरी बुक्की वाले फरार होत असत पण आता सगळा पोलीसांचा मामला चिडीचूप झाला आहे या मागचे कारण न कळण्या ऐवढे जनता आता दुध खुळी राहिली नाही.शहरात तर पावलापावलावर मटका बुक्की चालू आहेत.नावाला एखाद्या बुक्की वर धाड टाकतात त्यानंतर जामीन लगेच सकाळ पासून पुन्हा बुक्की चालू. या कडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे गरजेच आहे नाहीत या उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराचे काही प्रमाणात आपण ही जिमेद्दार असू याचे भान असावे असे जनता चर्चा करत असून लवकरात लवकर या मटका बुक्यावर व मालका वर कडक कारवाई करावी अशी जनतेतून मागणी होत आहे.