• Fri. Apr 24th, 2026

पोलीस उपअधीक्षक कमलेश मिनाजी अवैध धंदे मटका,लाॅज,गुटखा वर कधी कारवाई करणार?

Bybaba maske

Dec 7, 2024

पोलीस उपअधीक्षक कमलेश मिनाजी अवैध धंदे मटका,लाॅज,गुटखा वर कधी कारवाई करणार?

रोखठोक न्युज वार्ताहर 

केज तालुक्यात काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी डोके वर काढले आहे.त्यात प्रामुख्याने मटका व त्याच्या बुक्या या मोठ्या प्रमाणात पावलो पावली दिसत आहेत तरी ही पोलीस प्रशासन त्याच्या कडे दुर्लक्ष करत आहेत.याचे कारण जनतेला अध्याप कळत नाही.पोलीस उपअधीक्षक पंकज कुमावत असतानाचा जो दरारा व इज्जत पोलीस प्रशासनास होती ती आता कुठेच दिसत नाही.गल्ली बोळात,खेड्यापाड्यातच नव्हे तर केज पोलीस स्टेशन च्या हक्के च्या अंतरावर मटका घेतला जातो.पोलीस असताना ऐवढ धाडस केल जात हे बघून केज तालुक्यातील नागरिक पोलीसांकडे बोट दाखवतात त्या मुळेच पोलीस बदनाम होत आहेत.

त्याच प्रकारे लाॅज हे अनैतिक संबंधाचे प्रतिक होत आहे. लाॅज वर कुटूंबा साठी नसून तेथे अनैतिक धंदे चालवले जात आहे.चंदनसावरगाव पासुन झालेली लाॅज ची सुरुवात कळंब रोड, धारूर रोड ते मस्साजोग नाही नाही म्हणता 30 च्या आसपास लाॅज आहेत खरच ऐवढ्या लाॅज ची गरज आहे का. येथे अनैतिक गोष्टी होतात का याची कारवाई करून तपासणी करावी.कारण काही महिन्या पुर्वीच एका तृतीय पंथीने मस्साजोग येथील लाॅज वर आत्महत्या केली होती तर दोन दिवसा पुर्वी केज मधील एका लॉजवर पकडलेल्या जोडप्यात अल्पवयीन मुलगी असल्याची जनतेतून चर्चा होते. 

तर केज शहरात गुटखा बंद असताना सरास सगळ्याच पानपट्टी असो किराणामालाचे दुकान असो गुटखा सरास भेटतो आहे यात तरुण पिढी बरबाद होत आहे.

मटक्का बुक्की, लाॅज व गुटख्यावर तात्काळ कारवाई झाली पाहीजे यातून नागरिकात चर्चा होत असून न राहून सर्व केज तालुक्यातील जनतेला पंकज कुमावत साहेबांची आठवण येत आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!