• Fri. May 1st, 2026

वाल्मीक कराड वर संक्रांत!! जेल की बेल आज कळनार? देशमुख सारखे टेन्शनमध्ये होते कोणाचे तरी त्यांना सारखे फोन येत होते पत्नी अश्विनी देशमुख यांचा मोठा खुलासा

Bybaba maske

Jan 14, 2025

वाल्मीक कराड वर संक्रांत!! जेल की बेल आज कळनार?

देशमुख सारखे टेन्शनमध्ये होते कोणाचे तरी त्यांना सारखे फोन येत होते पत्नी अश्विनी देशमुख यांचा मोठा खुलासा

रोखठोक न्युज वार्ताहर 

 संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेमुळे बीडसह संपूर्ण महाराष्ट्राचे वातावरण चांगलेच तापलेले आहे. याप्रकरणातील आत आरोपींना मोक्का लावण्यात आलेला आहे. वास्तविकतः याप्रकरणातील खरा मास्टरमाईंड हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. असे असतानाही कराडला वाचविण्याचा प्रधान सरकारकडून होत आहे, खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कराडची आज चौदा दिवसांची पोलिस कोठडी संपत आहे. त्यानुसार त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याला जेल की बेल हे ठरणार आहे. विशेष म्हणजे हत्येच्या एक महिला आधी

संतोष देशमुख यांना वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून जिवे मारण्याचे फोन.

होते, असा गौप्यस्फोट संतोष देशमुख यांच्या पानी आश्विनी देशमुख यांनी केला आहे. या सर्व गोष्टींमुळे कराडवर ३०२, मोका लावण्यासाठी मरसाजोग ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. काल धनंजय देशमुख यांनी स्वतः पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर देशमुख यांनी आपले आंदोलन मागे घेतले तर आज दि. १४ जानेवारी रोजी एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली है मस्साजोगमध्ये जावून तपासाबद्दल माहिती देणार आहेत. तेलींच्या भेटीनंतर भरसाजोगकर आंदोलनाची पुढची दिशा तरविणार आहेत. एकंदरित या सर्व घडामोडींवसनच बात्मिक कनावर संक्रांत कोसळणार असल्याचे पहायला मिळत.

देशमुख सारखे टेन्शनमध्ये होते कोणाचे तरी त्यांना सारखे फोन येत होते पत्नी अश्विनी देशमुख यांचा मोठा खुलासा

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली आहे. वातावरण चांगलंच तापल आहे. याप्रकरणात संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी मोठा खुलासा केला आहे. संतोष देशमुख यांचं अपहरण होण्यापूर्वीचा संपूर्ण घटनाक्रम त्यांनी सांगितला आहे.

‘मला जास्त काही माहिती नाही, ते फक्त एवढेच बोलले थोडी किरकिरी झाली, त्यांना भीती वाटते. ते टेन्शनमध्ये होते मी त्यांना विचारलं काय झालं काय नाही, त्यांनी सांगितलं थोडे भांडण झाले आहेत. ते लोक जरा गुंड प्रवृत्तीचे आहेत, मला भीती वाटते असं त्यांनी मला सांगितलं. त्यांना भीती वाटत होती ते दोन दिवस सारखं टेन्शनमध्ये होते. त्यांना सारखे फोन येत होते, पण मी काय एवढं लक्ष दिलं नाही, पण त्यांना फोन येत होते. फोनवर काय बोलणं सुरू होतं ते काय मी ऐकलं नाही.

९ तारखेला ते लातूरहन मस्साजोगला आले होते, त्यांना सोमवारचा उपवास असतो म्हणून मी त्यांना सोमवार सोडल्याशिवाय जाऊ नका म्हटलं, त्या दिवशी जाऊ नका म्हटले होते. त्यानंतर ते घरी थांबले थोडी उसळ खाल्ली त्यानंतर ते झोपले. पण त्यांना सारखे फोन येत होते, त्यामुळे ते साडेअकरा बाराच्या सुमारास गावाकडे आले. ते थांबले नाहीत त्यांना कुणाचे फोन येत होते म्हणून ते आले, आणि ही घटना घडली, असं अश्विनी देशमुख यांनी म्हटलं आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!