• Wed. Aug 26th, 2026

बीड वरून सकाळी केज पोलीस ठाण्यात आणले.  वाल्मीक कराड याला घेवून पोलिसांचा ताफा बीडच्या दिशेने रवाना 

Bybaba maske

Jan 15, 2025

बीड वरून सकाळी केज पोलीस ठाण्यात आणले.  वाल्मीक कराड याला घेवून पोलिसांचा ताफा बीडच्या दिशेने रवाना 

रोखठोक न्युज 

गौतम बचुटे/केज :- आज दि. १५ डिसेंबर रोजी वाल्मीक कराड याला माकोका न्यायालयात हजर करण्यासाठी पोलीस केज येथून पोलीस प्रचंड बंदोबस्तात रवाना झाले आहेत.

या बाबतची माहिती अशी की, खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी वाल्मीक कराड याच्यावर दि. १४ जानेवारी रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली त्या नंतर आरोपींच्या वकिलाने जामीन अर्ज सादर केल्यानंतर त्याच्याविरुद्ध खातेचा कटरचने आणि मोका अंतर्गत कारवाईचा अर्ज माननीय न्यायालयात सादर केला होता त्यानंतर दिनांक १५ जानेवारी रोजी वाल्मीक कराडला ११:३० वा. च्या सुमारास केज पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. त्यानंतर त्याला केज पोलीस ठाण्यात सर्व प्रक्रिया पार पाडल्या नंतर त्याला बीड येथील मकोका न्यायालयात हजर करण्यासाठी १२:३५ वाजता केज मधून प्रचंड पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना 

वाल्मीक कराड याला केज पोलीस ठाण्यातून बीडच्या दिशेने घेऊन जात असताना रस्त्याच्या दुतर्फा असलेली दोन्ही वाहतूक पोलिसांनी बंद केली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्यासह दंगल नियंत्रण पथक तैनात होते.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!