• Wed. Aug 26th, 2026

एसआयटी ने कोर्टात वाल्मिक कराड ला उघडे पाडले.वाल्मिक कराड याला पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी.

Bybaba maske

Jan 15, 2025

एसआयटी ने कोर्टात वाल्मिक कराड ला उघडे पाडले.

वाल्मिक कराड याला पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी.

बीड – खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड वर मकोका लावल्यानंतर पोलिसांनी त्याला केज पोलीस स्टेशन मध्ये नेवून पुन्हा बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश पाटील मॅडम यांच्यासमोर हजर केलं. यावेळी हत्या प्रकरणी तपास करण्यासाठी दहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली,त्यावर न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.

केज तालुक्यातील मसाजोग येथील  संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात वर्ग करून घेतलेल्या वाल्मिक कराड याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले

जिल्हा न्यायालयात अडीच वाजता सुनावणीला सुरवात झाली . अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर सुनावणी सुरु झाली . सरकार पक्षातर्फे वकील बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली.वाल्मिक कराड याच्यातर्फे वकील अशोक कवडे यांनी बाजू मांडली. वाल्मिक कराडला बीड जिल्हा न्यायालयात आणण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली असून एसआयटीने कस्टडीकडून कोठडीची मागणी केली.

एस आय टी ने संभाषणाची माहिती दिली.

1)संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण झाले त्यावेळी सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे यांच्यात पाच ते सहा वेळा कॉल केले गेले, दुपारी तीन वाजून दहा मिनिटे ते तीन वाजून तीस मिनिटे या दरम्यान फोनवर बोलणे झाले. 2)कराड याने संतोष देशमुख यांना फोनवर धमकी दिली. 3)वाल्मिक कराड वर अनेक गुन्हे दाखल 4)संतोष देशमुख हत्येची वेळ आणि संभाषण वेळ मिळतीजुळती 5)हत्ये मध्ये सहभाग असल्याचा तपास करावयाचा आहे.

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!