• Thu. Jun 4th, 2026

कामचुकार,भ्रष्ट,मुजोर,उद्धट, लाचखोर तहसील महसूल सहायक अजय फुलचंद केंद्रे यांच्या विरुद्ध तात्काळ निलंबनाची कार्यवाही करा; गोविंद मस्के शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई.  

Bybaba maske

Mar 25, 2025

कामचुकार,भ्रष्ट,मुजोर,उद्धट, लाचखोर तहसील महसूल सहायक अजय फुलचंद केंद्रे यांच्या विरुद्ध तात्काळ निलंबनाची कार्यवाही करा; गोविंद मस्के शहराध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई.

रोखठोक न्युज वार्ताहर 

 अंबेजोगाई तहसील येथील महसूल सहाय्यक अजय फुलचंद केंद्रे रा.चौरेवाडी (कातकरवाडी,, परळी विधानसभा मतदार संघ) ता.अंबेजोगाई जिल्हा बीड तेथील असून तहसील कार्यालय अंबेजोगाई येथे जूलै 2023 पासून महसूल सहाय्यक पदावर कार्यरत आहे.अजय फुलचंद केंद्रे हा कर्मचारी अतिशय अड्डदांड, भ्रष्टाचारी, कामचुकार,लाचखोर मुजोर राजकीय लागेबांधे असल्याचे सांगून मनमानी कारभार करीत आहे.त्याच्याकडे राजकिय आशीर्वादामुळे अकृषीक परवाना ( le out )व महसूल विभागाशी संबंधित सर्व महत्वाची कामे असलेल महसूल सहाय्यक पद असल्यामुळें,अजय फुलचंद केंद्रे जनसामान्य लोकांना पैशासाठी अडवणूक करून दमदाटी व गुंडागर्दी करुण अर्थिक लूट करीत आहे.एखाद्याने अजय फुलचंद केंद्रे यांच्या बेजबाबदारी वर्तनाची तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे केली तरी अजय फुलचंद केंद्रे हा वरिष्ठांना न जुमानता माजीमंत्री,माजी पालकमंत्री आणि आमदार यांच्या नावाचा उल्लेख करुण धमकावत आहे. असा आरोप गोविंद मस्के शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी अंबाजोगाई यांची मा.अतिरिक्त मुख्य सचिव साहेब महसूल व वन विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांना मा.उपविभागीय अधिकारी साहेब, अंबाजोगाई यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात

अकृषीक परवाना देण्याच्या आदेशासाठी तो वरिष्ट अधिकारी यांचे नाव सांगून अर्जदारकडून लाखों रुपयाची मागणी करतो. आणि वरिष्ट अधिकारी यांच्या परस्पर अर्जदारकडून लाखों रुपये वसूल करतो. जर अर्जदारणे आर्थिक मागणी फेटाळली तर अजय फुलचंद केंद्रे हा कर्मचारी अकृषीक परवाना च्या साठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्र तांत्रिक कारण पुढे करून देत नाही.अर्जदारकडून पैसे घेतल्या नंतरच नाहरकत प्रमाणपत्र अकृषीक परवाना देतो.तसेच अजय फुलचंद केंद्रे हा कर्मचारी अकृषीक परवाना चा आदेश कार्यालयीन वेळेत कार्यालयात अर्जदारस देत नाही. तर रात्री बे रात्री सकाळी अंबाजोगाई येथील भगवान बाबा चौक,माउली हॉटेल,महिला कॉलेज च्या आवारात तसेच वंजारी वसतिगृह आवारात देतो.अश्या बेजबाबदार माणसाची खात्यां अंतर्गत सखोल चौकशी केली तर या सर्व गोष्टी उघड होतील.अजय फुलचंद केंद्रे या कर्मचाऱ्याचे अंबाजोगाई तहसील कार्यालयातील रुजू दिनांकापासून महसूल सहाय्यक पदाचा पदभार घेतल्या पासून आज पर्यंतयची मोबईल रेकॉर्डिंग,whats app संभाषण मा साहेब आपण मागवून घेतले तर अजय फुलचंद केंद्रे याने मागीतलेल्या व घेतलेल्या लाचेची माहिती उघड होईल.त्यासाठी  अजय फुलचंद केंद्रे मोबईल रेकॉर्डिंग,whats app संभाषण तपासावे.तसेच अजय फुलचंद केंद्रे यांच्या महसूल सहाय्यक पदाचा पदभार काढून घेऊन त्यांचे निलंबन करावे. व महसूल खात्याची (तहसील कार्यालयाची) होणारी बदनामी तसेच जनसामान्य लोकांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवावी. वंचित बहुजन आघाडीचे अंबेजोगाई शहर अध्यक्ष गोविंद खंडू मस्के हे त्यांच्या स्वताच्या मालकी कब्जेतील जमिन गट नंबर-44 मौजे वाघाळा(राडी) याचा अकृषीक परवाना साठी दिनांक 16/02/2024रोजी प्रस्ताव दाखल असुन, त्यास लागणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे.अंबाजोगाई तहसीलचे महसूल सहाय्यक अजय फुलचंद केंद्रे रा.चौरेवाडी (कातकरवाडी) ता.अंबाजोगाई जिल्हा बीड हल्ली मुक्काम भगवान बाबा चौक अंबाजोगाई.(परळी विधानसभा मतदारसंघ) यांच्या महसूल विभागाकडे गोविंद खंडू मस्के यांचा अकृषीक परवाना अर्ज असल्याने एक वर्षे लोटला म्हणून गोविंद खंडू मस्के आणि..वंचित बहुजन आघाडी शहर उपाध्यक्ष रशीद कलीम शेख. प्रशांत ईश्वर राऊत हे चौकशी साठी दिनांक 20/03/2023 रोजी वार शुक्रवारी दुपारी 5.32 मिनिट वाजता गेले असता. महसूल सहाय्यक अजय फुलचंद केंद्रे यांना विचारले की अकृषीक परवाना चे काय झाल साहेब एक वर्षे होऊन गेले आपण मला कुठलेच पत्र दीले नाही. किँवा आपण मला अकृषीक परवाना बाबत काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. तर अजय फुलचंद केंद्रे यांनी मला अकृषीक परवानासाठी साठी 1,000,00 /- अक्षरी एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी गोविंद खंडू मस्के यांना केली. गोविंद खंडू मस्के पैसे (लाच)देणार नाही.म्हटले माझी ऐपत नाही तुम्हाला पैसे देण्याची.असे गोविंद खंडू मस्के बोलल्या नंतर अजय फुलचंद केंद्रे त्यांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याची उघड धमकी गोविंद खंडू मस्के यांना दिलेली आहे.वास्तविक पाहता गोविंद मस्के हें वंचित बहुजन आघाडीचे चे सक्रिय पदाधिकारी असल्याचे जातीने महार असल्याचे ज्ञात असताना खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिलेली आहे.तरी महसूल सहाय्यक अजय फुलचंद केंद्रे विरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा आपल्या कार्यालयापुढे दि. 10/04/2025 रोजी आमरण उपोषण करण्यात येईल. असा इशारा या निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.. या वेळेस गोविंद मस्के शहर अध्यक्ष, नितिन सरवदे शहर महासाचिव , सतिश सोनवणे तालुका प्रसिद्धी प्रमुख, शेख रशीद शहर उपाध्यक्ष.राज कुमार शाहीर, सुनिल कांबळे, जीवन घाडगे उपस्थित होते..

baba maske

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!